विध्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

Share this News:
पुणे प्रतिनिधी, विशाल मुंदडा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विज्ञान शाखेच्या एका विभागात उच्च शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज घडली. रेश्मा गायकवाड (रा. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
ही विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एमएससीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत असून ती विद्यापीठातील मुलींच्या तीन नंबर वसतिगृहात राहत होती. तिच्यासोबत इतर मैत्रिणीही राहत होत्या.
दरम्यान मैत्रिणी बाहेर गेल्यानंतर तिने रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने तिच्या मैत्रीणी रूमवर आल्यानंतर हा प्रकार समोर आला. चतुशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृत्यदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.