विनाअडथळा इण्डेन पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑईलच्यापुण्यातील चाकणमधील एलपीजी बॉटलिंग प्लांटला 25 वर्षे पूर्ण

Share this News:

28 -3-2019 : इंडिन ऑईलचा पुण्यातील चाकणमधील एलपीजी बॉटलिंग प्लांट हा चाकणमध्ये पुण्यापासून 40
किलोमीटर अंतरावर असून त्याची सुरूवात 1991 मध्ये झाली. त्याचे प्रत्यक्ष बॉटलिंगचे काम 1993
मध्ये सुरू झाले.

 

हा प्लांट 42 एकरवर उभारलेला असून त्यातील 16 एकर प्रतिबंधित (non-licensed) क्षेत्र आहे.
प्लांटची क्षमता 1800 एम’टी आहे. दिवसाला सर्वसाधारणपणे 32000 सिलेंडर्स भरले जातात. ते
महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यामध्ये 253 वितरकांच्या मध्यमातून वितरित केले जातात.
या ठिकाणी गॅस भरण्याचे काम दोन शिफ्टमध्ये चालते.या प्लांटमध्ये 5 किलो, 14.2 किलो, 19
किलो, 47.2 किलो आणि 425 किलो क्षमतेचे सिलेंडर्स भरले जातात.
लोकप्रिय असलेल्या इण्डेनबरोबर नॅनोकट (NANOCUT) आणि जम्बो (JUMBO) या ब्रँडचेही काम
याठिकाणी चालते. नॅनोकट हा ब्रँड उद्योगांमध्ये मेटलचे कटिंग करण्यासाठी वापरला जातो. जम्बो हा
आमचा 425 किलोची क्षमता असलेला सिलेंडर ब्रँड आहे.

याठिकाणी गुणवत्ता आणि प्रमाण योग्य राखणसाठी नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते. ओ
रिंगमधील कमतरता, वॉल्व्ह लिक किंवा बाँडी लिकेज याबाबत दक्षता घेतली जाते. या प्लांटमध्ये
अग्निपासून सावधानता बाळगणसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात
प्लांट बंद करणारी स्वंयचलित इंटरलॉक आणि शटडाऊन यंत्रणा आणि गॅस नियंत्रित करणारी यंत्रणा
आहे. शेजारी उद्योगांच्या सहकार्याने या ठिकाणी वेळोवेळी माँकड्रिल केले जातात. आपत्तीच्या काळात
उपयोगात आणण्यासाठी याठिकाणी 74 लाख लिटर क्षमतेची पाणीसाठवण यंत्रणा तयार ठेवण्यात
आली आहे.

 

चाकण एलपीजी बॉटलिंग प्लांटला ’ मुंबई आणि गुजरात’मधून “ ट्रक ’मधून पुरवठा केला जातो.
लवकरच हा एलपीजीचा पुरवठा उरण (’ मुंबई) ’ मधून पाईपलाइन ’ मधून सुरू होणार आहे.

 

चाकण एलपीजी बॉटलिंग प्लांटला अविरत सेवेचा इतिहास असून प्रभावीपणे अतिशय