शाओमीतर्फे तीन नवीन उत्पादनांच्या अनावरणासह जगभरात रेडमी नोट 5 प्रो व एमआय एलईडी टीव्ही 4 (55 इंची) सादर  

Share this News:

शाओमीने आज एका भव्य समारोहासह भारतात उच्च स्तरावर 2018 ची सुरुवात केली आहे. या समारोहामध्ये तीन नवीन उत्पादनांचे अनावरण करण्यात आले. आज जगाला रेडमी नोट 5 प्रोची पहिली झलक पाहायला मिळाली आणि पहिल्यांदाच शाओमीने चीनबाहेरील जागतिक बाजारपेठेमध्ये आपला टीव्ही लाँच केला आहे.

रेडमी नोट 5 व रेडमी नोट 5 प्रो या डिवाईसेसने भारतातील एमआय फॅन्ससाठी अभूतपूर्व दरांमध्ये फुल स्क्रिन डिस्प्लेमधील नाविन्यता सादर केली आहे. या डिवाईसेसची किंमत 9,999 रुपयांपासून सुरू होते. अत्यंत यशस्वी आणि काऊंटरपॉइण्टनुसार 2017 मधील भारतात सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन रेडमी नोट 4ने शाओमीची अभूतपूर्व दरामध्ये दर्जा व डिझाइन सादर करण्याची कटिबद्धता सिद्ध केली आहे. युजर्स रेडमी नोट सिरीजमधून सर्वोत्तम डिवाईसेसची अपेक्षा करत असताना हे दोन नवीन स्मार्टफोन्स डिझाइन, कॅमेरा व कामगिरीच्या संदर्भात त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करतील.

शाओमीचे उपाध्यक्ष व शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले की, शाओमीमध्ये आम्ही सर्वांना वाजवी दरात उच्च दर्जाचे डिवाईसेस देण्यासाठी कार्य करतो. आमची सर्व उत्पादने आमची मूल्ये आणि आम्ही करत असलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिक आहेत. आम्ही रेडमी नोट 5, रेडमी नोट प्रो व एमआय एलईडी टीव्ही 4 या तीन नवीन उत्पादनांसह 2018ची सुरुवात करण्यास उत्सुक आहोत. आम्ही आशा करतो की एमआय फॅन्स आम्ही सादर करत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा आनंद घेतील.

जागतिक स्तरावर शाओमीच्या लक्षणीय बदलासह पहिल्यांदाच एमआय टीव्ही चीनबाहेरील बाजारपेठेमध्ये दाखल होत आहे. 138.8 सेमी (55 इंची) एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 हा जगातील सर्वात स्लीम एलईडी टीव्ही आहे. हा टीव्ही फक्त 4.9 मिमी स्लिम असून टीव्हीमध्ये पूर्णतः भारतीयांसाठी रिडिझाइन केलेले इंटेलिजण्ट कन्टेन्ट-फर्स्ट पॅचवॉल सॉफ्टवेअर आहे. 39,999 रुपये किंमत असलेला एमआय एलईडी टीव्ही 4 भारतातील टीव्ही क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. रेडमी नोट 5 प्रो हे जगातील पहिले स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये ऑक्टा-कोअर क्वॉलकॉमच् स्नॅपड्रॅगनत्र 636 आहे. स्नॅपड्रॅगनत्र 636 पॅकेजचा भाग म्हणून रेडमी नोट 5 प्रो मध्ये क्वॉलकॉमच् क्रायोत्र कोअर आहे. हे कोअर सामान्यतः एसआयसीएसच्या प्रमुख स्नॅपड्रॅगन 800 सिरीजमध्ये दिसण्यात येते. 1 लाखाहून अधिक अ‍ॅनटूटू बेंचमार्क स्कोअर्ससह रेडमी नोट 5 प्रो आठ क्रायो 260 कोर, अँड्रेनो 509 जीपीयू आणि 6 जीबीपर्यंतच्या डीडीआर4एक्स रॅमसह सर्वोत्तम डिवाईस आहे.

रेडमी नोट 5 मध्ये रेडमी नोट 4 व इतर डिवाईसेसची वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. रेडमी नोट 5 प्रो मधील 18.9 एचडी डिस्प्लेप्रमाणे तयार करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये एसओसी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 आहे. 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज क्षमता असलेला रेडमी नोट 5 प्रत्येक पैलूमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या रेडमी नोट 4 च्याही काही पावले पुढे आहे. रेडमी नोट 5 मध्ये दीर्घकाळ टिकणारी बॅटरी असून पूर्वीच्या डिवाईसपेक्षा अधिक अपग्रेड केलेली वैशिष्ट्ये आहेत. रेडमी नोट 5 प्रो प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये एलईडी सेल्फी-लाइट आहे. ज्यामुळे अंधुक प्रकाशात देखील परिपूर्ण सेल्फी काढता येतात. रेडमी नोट 5 ची किंमत 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज व्हेरिएण्टसाठी 9,999 रुपये आणि 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज व्हेरिएण्टसाठी 11,999 रुपये आहे.

138.8 सेमीची (55 इंची) एमआय एलईडी स्मार्ट टीव्ही 4 ही जगातील सर्वात पातळ एलईडी टीव्ही आहे. या टीव्हीच्या स्लिम डिझाइनची जाडी फक्त 4.9 मिमी आहे. या फ्रेमलेस डिस्प्ले डिझाइनमधून इर्मसिव्ह व्युईंगचा अनुभव मिळतो. सर्वात मोठे 138.8 सेमी (55 इंच) 4के एलईडी डिस्प्ले आणि एचडीआर10 कन्टेन्टसह एमआय एलईडी टीव्ही 4 सुस्पष्ट चित्रे व आकर्षक रंगसंगती देते. याव्यतिरिक्त एमआय टीव्ही 4 मध्ये ड्युअल स्पीकर सुद्धा आहे. एमआय टीव्ही 4 चे झीरो गॅप डिस्प्ले तयार करण्यासाठी शाओमीने कॉर्निंग आयरिस ग्लास लाइट गाइड प्लेटचा वापर केला. ही ग्लास प्लेट इतर टीव्हींमध्ये आढळून येणार्‍या प्लास्टिक लाइट गाइड प्लेट्सच्या तिप्पट महागडी व पाचपट मजबूत आहे.