श्रीमद राजचंद्र लव अँड केअरच्यावतीने पाच कारागृहामधील सुमारे ३००० कैद्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप
श्रीमद राजचंद्र लव अँड केअरच्या स्वयंसेवकांनी येरवडा कारागृहात प्युअर कार्यक्रमांतर्गत आवश्यक ब्लँकेट्स , प्लेट्स , कटोरे (वाट्या ) आणि मग यासारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .
येरवडा कारागृहात झालेल्या या कार्यक्रमास कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे , येरवडा येथील तुरुंग अधीक्षक यु. टी. पवार , इतर अधिकारी , पश्चिम विभाग कोल्हापूर , सांगली , अहमदनगर व सोलापूर येथील तुरुंग अधिकारी आणि श्रीमद राजचंद्र मिशनचे पुणे विभागाचे अध्यक्ष तुषार हेमानी , उपाध्यक्ष भरत मेहता , हितेन मेहता , जिग्नेश फूरिया आदी मान्यवर उपस्थित होते .
यातील प्रत्येक आवश्यक वस्तू सुमारे ३००० कैद्यांना वितरित केल्या . येरवडा तुरूंगातून पुणे , कोल्हापूर , सांगली व अहमदनगर आणि सोलापूर येथील पाच कारगृहांना या वस्तू वितरित केल्या जाणार आहेत . यामुळे महाराष्ट्रात अशा प्रकारची सर्वात मोठी वितरण व्यवस्था बनवीत आहे .सोलापूर तुरुंगासाठी दोन लेझर प्रिंटर आणि युपीएस देण्यात आले .
