सरकारने कर्जमाफी न दिल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयाला वेढा घालू – अजित पवार

Share this News:

पिंपळगाव – दि.१७ एप्रिल २०१७ : राज्यातील शेतकरी कर्जाच्या ओझ्यामुळे अडचणीत आला आहे, सध्या त्याला कर्जमाफीची नितांत गरज आहे. जर अर्ज- विंनत्या करुन आणि संघर्षयात्रा काढून शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नसेल तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयाला वेढा घालू व जो पर्यंत शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री आणि सरकारमधील मंत्र्यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांनी संघर्ष यात्रे दरम्यान पिंपळगाव कृषीउत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत सरकारला दिला.

पुढे ते म्हणाले कर्जबाजारीपणामुळे शेतकरी तणावाखाली आहे. अशा अवस्थेत तो आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी शासन दरबारी येतो, परंतु या शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं न ऐकता त्यांना लाथा-बुक्क्या तुडवलं जातं, ही गोष्ट निंदनीय आहे. आमचं शासनातील अधिकाऱ्यांना देखील सागंणे आहे की आमच्या शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवू नका.

या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी, शेकापचे नेते प्रवीण गायकवाड, आ. जितेंद्र आव्हाड, आ.राजेश टोपे, आ.अब्दुल सत्तार, आ सुनील केदार, आ.पंकज भुजबळ, आ.हेमंत टकले, आ. सुमनताई पाटील, आ.दिपिका चव्हाण, आ. विद्याताई चव्हाण, आ.यशोमती ठाकूर, आ.प्रदीप नाईक , आ.जयकुमार गोरे,, आ.प्रकाश गजभिये , आ. ख्वाजा बेग, आ.हणमंत डोळस, पिंपळगाव बसंवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलिप बनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.