सॅनिटरी पॅडसवरील GST रद्द करावा यासाठी राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने खासदार सौ.सुप्रिया सुळे,मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.सुरेखा पेडणेकर,व राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सॅनिटरी पॅडसवरील GST विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सदरहू आंदोलन सेल्स टॅक्स ऑफिस(विक्रीकर भवन) सर्कल,२७ नेसबीट रोड, महाराणा प्रताप चौक,माझगांव,मुंबई-४०० ०१० येथे गुरुवार दिनांक १८-१-२०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.या आंदोलनामध्ये मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे सहभागी होणार आहेत.तरी सर्व पत्रकारमित्र,छायाचित्रकार,वृत्तवाहिनी प्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे ही विनंती.
