हिमालया मेन तर्फे डेली नरिश, अँटी डँड्रफ आणि अँटी हेअर फॉल स्टायलिंग जेल बाजारात दाखल

Share this News:

हिमालया मेन घेऊन येत आहे अनेक गुणांनी युक्त असे हिमालया मेन हेअर स्टायलिंग जेल, केसगळती व कोंड्याशी लढा देण्यासाठीची ही खास उत्पादने. हे जेल तीन अनोख्या प्रकारामध्ये उपलब्ध आहेत – हिमालया मेन डेली नरिश स्टायलिंग जेल, हिमालया मेन अँटी डँड्रफ स्टायलिंग जेल आणि हिमालया मेन अँटी हेअर फॉल स्टायलिंग जेल. हे जेल दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध् आहेत – स्ट्रॉंग होल्ड- म्हणजेच फर्म स्टाईलसाठी, दीर्घकाळ टिकणारे जेल आणि केसांच्या हलक्या, लवचिक होल्डसाठी नॉर्मल होल्ड होय.

ह्या जेलमध्ये असलेल्या बदाम, टी ट्री ऑईल आणि भृंगराज यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे विविध प्रकारच्या केसांच्या समस्यांपासून सुटका मिळते, तर बांबूच्या अर्काने केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. हिमालया मेन डेली नरिश स्टायलिंग जेल केसांना दीर्घकाळ टिकणारी चमक देऊन केसांची पकड घट्ट करते. ह्यात बदाम आणि बांबू यांचे मिश्रण असल्यामुळे केसांना पोषण आणि मजबूत करण्यास मदत होते. हिमालया मेन अँटी डँड्रफ स्टायलिंग जेल केसातील कोंडा घालवण्यास मदत करते. त्याचबरोबर बराच वेळ केसांची स्टाइल टिकवून ठेवते. टी ट्री ऑईल, लिंबू आणि बांबूमधील पौष्टिक घटक केसांमधील कोंडा मूळापासून नष्ट करतात व केसांना मजबूती देतात.

हिमालया मेन अँटी हेअर फॉल स्टायलिंग जेल अधिक काळ केसांची चकाकी टिकवून ठेवते. शिवाय, यामुळे केस गळती कमी आणि नियंत्रित करण्यास मदत मिळते. यातील भृंगराज, पलाष आणि बांबू यांच्या मिश्रणामुळे केसांची वाढ होते आणि केसांचे आयुष्य वाढते. हे जेल केस गळती थांबवण्यास मदत करते व केसांना नैसर्गिक ताजेपणा- सौंदर्य देतो. सर्व प्रकारचे हिमालया मेन्स स्टायलिंग जेल आता ५० मिली. युनिट ५० रुपयांत आणि १०० मिली.चे युनिट्स ९५ रुपयांना अशा आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.