​पुणे शहरातील नागरिकांसाठी सूचना

Share this News:


*भीमा कोरेगाव* येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सूचित करण्यात येते की सदर घटनेच्या संदर्भाने समाजभावना भडकवणाऱ्या पोस्ट्स, अफवा सोशल मीडियावर आणि व्हाट्सऍप सारख्या इतर अँप द्वारे पसरवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींविरुद्ध *कडक कायदेशीर कारवाई* करण्यात येईल.

आपणास जर अशा पद्धतीच्या पोस्ट, ऑडिओ, विडिओ मेसेज प्राप्त झाल्यास त्यावर विश्वास न ठेवता त्या त्वरित डिलिट कराव्यात.

आपणास अशा पोस्ट बद्दल काही माहिती मिळाल्यास ती आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशन, पोलीस कंट्रोल रूम, अथवा सायबर सेल, पुणे याना कळवावी. 

– सायबर सेल,

पुणे

020-26123346.