22व्या फेडरेशन कपसाठी रन अॅडम टायटल स्पॉन्सर

Share this News:

मुंबई, 28 फेब्रुवारी 2018: अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने 5 ते 8 मार्च 2018 या कालावधीत एनआयएस-एनएस, पटियाला येथे होत असलेल्या 22व्या फेडरेशन कप सीनिअर नॅशनल अॅथलेटिक चॅम्पिअनशिप्स 2018 साठी टायटल स्पॉन्सर म्हणून रन अॅडम या अॅथलिट्सचे स्वप्न पूर्ण करण्याचा उद्देश असलेल्या स्पोर्टिंग टॅलेण्ट अॅपच्या नावाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 4 ते 15 एप्रिल 2018 या कालावधीत ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी अंतिम पात्रता फेरी असणार आहे.

ही घोषणा अंजू बॉबी जॉर्ज (ऑलिम्पिअन) व नीरज चोप्रा (अंडर 20 आयएएएफ वर्ल्ड चॅम्पिअन, जेव्हलिन थ्रो) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रन अॅडमबरोबरच्या सहयोगाविषयी बोलताना एएफआयचे सचिव सी. के. वाल्सन म्हणाले, “भारतामध्ये क्रीडा क्षेत्रातील टॅलेण्ट मोठ्या प्रमाणात आहे. स्पोर्टिंग टॅलेण्टना प्रोत्साहन देण्याचे आमच्याप्रमाणेच उद्दिष्ट असलेल्या रन अॅडमशी सहयोग केल्याने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळेल. 5 ते 8 मार्च या कालावधीमध्ये होणाऱ्या 22व्या फेडरेशन कपमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी वातावरणनिर्मिती होणार आहे. भारतातील खेळांच्या इतिहासात महत्त्वाचा मैलाचा टप्पा निर्माण केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देईल, अशा अनुकूल सुविधा निर्माण केल्याबद्दल मी रन अॅडमचे स्वागत आहे.”

अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाबरोबरच्या सहयोगाविषयी बोलताना रन अॅडमचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक व खेळांची आवड असलेले के. येरगसेल्व्हन यांनी सांगितले, “22व्या फेडरेशन कप सीनिअर नॅशनल अॅथलेटिक चॅम्पिअनशिप्स 2018 साठी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाशी सहयोग करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या 21व्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी यानिमित्ताने अंतिम पात्रता चाचणी होणार असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यामुळे संधी मिळणार आहे. खेळाडूंसमोर असलेली मोठमोठी आव्हाने पेलण्यासाठी देशातील सर्व क्रीडा सुविधा एका छताखाली आणणे, हे रन अॅडमचे उद्दिष्ट आहे.” रन अॅडमने काल एनएस-एनआयएस पटियाला येथे आयोजित केलेल्या इंडियन ग्रँड प्रिक्स-1 या एएफआयच्या सीझन ओपनरचेही प्रायोजकत्व केले.

रन अॅडम 22व्या फेडरेशन कप सीनिअर नॅशनल चॅम्पिअनशिप्स – पटियाला येथे होणारे कार्यक्रम:

पुरुष – 100m, 200m 400m, 800m, 1500m, 5000m, 10000m, 110mH, 400mH, 3000m एससी, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, पोल व्हॉल्ट, थाळीफेक, भालाफेक, जेव्हलिन थ्रो, डिसेथ्लॉन

महिला – 100m, 200m 400m, 800m, 1500m, 5000m, 10000m, 100mH, 400mH, 3000m एससी, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, पोल व्हॉल्ट, थाळीफेक, भालाफेक, जेव्हलिन थ्रो, हेफ्थेथ्लॉन