महावितरणच्या मोबाईल ॲप्सचे विधानपरिषदेत कौतुक
मुंबई, दि. 31 मार्च 2017 :- महावितरणच्या मोबाईल ॲप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असूनमहावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. याचा अनुभवराज्याच्या लोकप्रतिनिधींनाही येत असून आज विधान परिषदेत महावितरणच्या मोबाईलॲप्सचे कौतुक करण्यात आले. मोबाईल ॲप्सद्वारे ग्राहकांना विविध सेवा ऑनलाईनदेणारी महावितरण ही देशाच्या विद्युत वितरण क्षेत्रातील पहिली कंपनी आहे.
महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्समुळे राज्यातीलग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईलॲप्सद्वारे विविध दैनंदिन कामे ऑनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्याकामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. याचा प्रत्यय ग्राहकांसहलोकप्रतिनिधींनाही येत असून आज विधानपरिषदेतील कामकाजात विधानपरिषदेच्याज्येष्ठ सदस्या श्रीमती निलमताई गोरे यांनी मोबाईल ॲप्सचे कौतुक केले.
अशाप्रकारचा मोबाईल ॲप्समुळे ग्राहकांना देण्यात येत असलेल्या नवीनवीजजोडण्या, वीजबिलांची माहिती व वीजबील भरणा तसेच वीजसेवांविषयी तक्रारी वअभिप्राय इत्यांदी सेवांबद्दल श्रीमती निलमताई गोरे यांनी समाधान व्यक्त करून कौतुककेले. राज्यातील सुमारे 12 लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी मोबाईल ॲप्स डाऊनलोड केलेआहे. या ॲप्सद्वारे आतापर्यन्त 48 हजार 967 नवीन ग्राहकांना वीजजोडणी देण्यातआली आहे.
महावितरणच्या सुमारे 1 कोटी 21 लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाचीनोंदणी महावितरणकडे केली असून ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, ऑनलाईन बील,नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभालव दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फेएसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत.
