महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक संजीब रॉय यांना पीचडी प्रदान
मुंबई, दि. 01 जानेवारी 2018 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात भरती विभागात कार्यरत सहाय्यक महाव्यवस्थापक संजीब रॉय यांना राजस्थान येथील पॅसिफिक विद्यापिठाने नुकतीच पीचडी ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांची कार्यसंतुष्टी हा संजीब रॉय यांच्या शोध निबंधाचा विषय होता. त्यांनी यापूर्वी कायद्याचीही पदवी प्राप्त केली आहे.
