फोर्डतर्फे भारतीय ग्राहकांसाठी फोर्ड फ्रीस्टाईल़चे अनावरण
पुणे, 31 जानेवारी 2018 – फोर्डतर्फे नव्याकोर्या फोर्ड फ्रीस्टाईल़ या आधुनिक जागतिक उत्पादनाचे अनावरण करण्यात आले केले असून हे भारतीय ग्राहकांसाठी निर्माण केलेले कूल, सक्षम असे कॉम्पॅक्ट युटिलीटी व्हेइकल आहे. फोर्डच्या या नव्याकोर्या उत्पादनात एसयूव्हीसारखे आधुनिक डिझाईन, अद्वितीय परफॉर्मन्स, कल्पक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट इंधनक्षमता यांचा सुरेल मिलाफ साधला गेला असून भारतीय ग्राहक तसेच, जगभरातील बाजारपेठांसाठी हा एक उत्तम पर्याय तयार झाला आहे. फ्रीस्टाईलच्या जागतिक विक्रीला प्रथम भारतातच सुरुवात होणार असून ग्राहकांसाठी 2018 च्या दुसर्या तिमाहीत ही गाडी बाजारात दाखल होणार आहे.
फोर्ड इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा़ म्हणाले, फोर्ड फ्रीस्टाईलचे जागतिक अनावरण प्रथम भारतात करण्यात येत असल्यामुळे, यातून फोर्डची भारताप्रति असलेली बांधीलकी स्पष्ट होते. भारतीय ग्राहकांना हवे असलेले मौल्यवान उत्पादन आम्ही या माध्यमातून त्यांना देत आहोत. कूल, सक्षम आणि कनेक्टेड फोर्ड फ्रीस्टाईलच्या माध्यमातून, भारतातील फोर्ड ग्राहकांच्या कुटुंबात भर घालण्यासाठी आमच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्येही आम्ही मौल्यवान भर घालत आहोत.
ग्राहकांची एसयूव्हीसारख्या वाहनांची गरज व मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने, नवीन फ्रीस्टाईल या गाडीमुळे फोर्डची प्रतिमा अधिक उंचावणार आहे. अशा प्रकारची वाहने त्यांच्या अद्वितीय आसन व्यवस्थेसाठी तसेच, शहरी भागातील गर्दी आणि इतर बाबी लक्षात घेऊन उत्तम ग्राऊंड क्लिअरन्ससाठी विकत घेतली जातात. कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये फोर्ड कंपनीने इकोस्पोर्ट्स या मॉडेलच्या माध्यमातून प्रवेश केला असून यामुळे भारतातील सरासरी ऑटोमोटिव्ह विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत गेली. 2013 ते 2016 या तीन वर्षांच्या कालावधीत या विक्रीत तिप्पट वाढ झाली. एकट्या 2017 च्या वर्षांत, भारतातील एसयूव्हींची विक्री 37 टक्क्यांनी वाढली, तर एकूण वाहनविक्रीत केवळ 9 टक्क्यांचीच वाढ नोंदवण्यात आली.
आपले आयुष्य पूर्णतः स्वच्छंदीपणे जगण्याची इच्छा असलेल्या ‘फ्री-स्पिरीटेड’ ग्राहकांच्या आकांक्षा नव्याकोर्या फोर्ड फ्रीस्टाईलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहेत. हे ग्राहक आयुष्यात कोणत्याही शक्यतांना सामोरे जायला घाबरत नाहीत आणि म्हणूनच, पूर्ण समर्पणाने गाड्याही चालवतात. आकर्षक लूक आणि कमांडिंग दृष्टिकोन असलेल्या फोर्ड फ्रीस्टाईल या गाडीचे डिझाईन अधिक महागड्या मिनी एसयूव्हीसारखेच आहे. याच्या डिझाईनमधील पुढून मागे जाणार्या आडव्या रेषांमुळे फोर्ड फ्रीस्टाईलला अधिक आधुनिक, मजबूत आणि एसयूव्ही लूक प्राप्त झाला आहे. या गाडीच्या फ्रंट बंपरला इंटिग्रेटेड स्कीड प्लेट आणि खास रचनाकृत फॅशिया सिलेक्शन देण्यात आले आहे. यामुळे, गाडीचा एसयूव्ही लूक आणि आकर्षकता कायम राखतानाच फ्रीस्टाईलला संरक्षक फूल-विड्थ बीम एलिमेंट मिळाला आहे. याच्या खास रचनाकृत रिअर फॅशियामुळे फ्रीस्टाईलची खिलाडू भूमिका अधिक स्पष्ट होते. तसेच, टेल लॅम्प्समधील काटेकोर डिटेलिंगमधून प्रत्येक रंग स्वतंत्रपणे ठळक दिसेल, याची काळजी घेतली जाते. फ्रीस्टाईलमधील काळ्या रंगाचे हाय काण्ट्रास्ट हेडलॅम्प्स फॉग लॅम्प्स बेझलसह अधिक उठून दिसतात. यातून त्यांची अधिक खंबीर आणि कमांडिंग अभिव्यक्ती दिसून येते. फ्रीस्टाईलमध्ये फोर्डचे नवीन तीन सिलेंडरयुक्त 1.2 लीटरचे टीआयव्हीसीटी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन छोटे, हलके पण तरीही मजबूत आणि अद्वितीय क्षमता प्रदान करणारे आहे. सहाजिकच प्रोत्साहक असलेल्या या इंजिनातून 96 पीएस पीक पॉवर आणि 120 एनएम टॉर्कची निर्मिती केली जाते.
फोर्डचा फन-टू-ड्राईव्ह दृष्टिकोन. फोर्डचे विश्वसनीय 1.5 लीटर डिझेल इंजिनही 100 पीएस पॉवर आणि 215 एनएम टॉर्क निर्माण करीत असून या गाडीत ग्राहकांना पेट्रोल व डिझेल या दोन्ही प्रकारच्या इंजिनांचे पर्याय उपलब्ध आहेत. सर्व वातावरणात फ्रीस्टाईलकडून खिलाडू ड्रायव्हिंग परफॉर्मन्स दिला जात असून यात वाढीव ट्रॅक रुंदीसह विशिष्ट पद्धतीने ट्यून्ड सस्पेन्शन, उच्च ग्राऊण्ड क्लिअरन्स, टीसीएस, ईबीडीसह एबीएस आणि विशिष्टरित्या ट्यून्ड ईपीएएस बसवण्यात आले आहेत.
फोर्डचे वैशिष्ट्य असलेली सर्व सुरक्षा उपकरणे फ्रीस्टाईलमध्ये देण्यात आली असून यात सहा एअरबॅग्स आहेत. अॅक्टिव्ह रोलओव्हर प्रिव्हेन्शन (एआरपी)च्या माध्यमातून, कोणत्याही वाईट परिस्थितीतही अधिक चांगल्या प्रकारे कामगिरी करण्यासाठी फ्रीस्टाईल डिझाईन करण्यात आली आहे. यामुळे, ब्रॅण्डचा फन-टू-ड्राईव्ह दृष्टिकोन कायम राहतो. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कण्ट्रोलसह यातील एआरपी सिस्टीममुळे रोलओव्हर परिस्थितीची शक्यता स्वयंचलितरित्या तपासली जात असून प्रत्येक टायरला आपोआप ब्रेक्स लागतात आणि इंजिनाचा टॉर्कही कमी होतो. फोर्ड फ्रीस्टाईलमध्ये फोर्डची सिंक 3 ही इन-कार इन्फोटेन्मेंट सिस्टीम बसवण्यात आली असून याला 6.5 इंची टचस्क्रीन देण्यात आली आहे. यामुळे चालकाचा मनोरंजनात्मक उपकरणांवर ताबा रहात असून संवादात्मक ध्वनी संदेशासह आपल्या स्मार्टफोनशीही कनेक्टेड राहता येते. सिंक 3 सिस्टीम अॅप्पल कारप्ले आणि अॅण्ड्रॉईड ऑटो कम्पॅटिबल ओएसना सहाय्यभूत आहे.
