एण्डतर्फे स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी हैशएण्डआईराइज मोहिमेची सुरूवात

Share this News:

पुणे, १६ फेब्रुवारी २०१८ – वर्षानुवर्षे जुन्या सामाजिक रूढींनी स्त्रियांच्या प्रगतीवर मर्यादा घातल्या आहेत. मात्र या सगळ्याला मागे टाकत AND(एण्ड) स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी एण्डतर्फे हैशएण्डआईराइज(#ANDiRISE) मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे जुन्या मूल्यांना छेद देत चौकटीच्या बाहेर पडलेल्या स्त्रियांना प्रकाशझोतात आणण्यात येणार आहे.

एण्ड तर्फे आयोजित केल्या जाणार्‍या या मोहिमेत बॉलिवुड स्टार करीना कपूर चार उल्लेखनीय/अद्वितीय/असामान्य स्त्री-संघाचे नेतृत्व करणार आहे. या चारही स्त्रियांनी वेगळ्या क्षेत्रात स्वतः छाप पाडली आहे आणि आता त्या त्यांच्या-त्यांच्या तत्त्वांनुसार आयुष्य जगत आहेत.

तीनदा नकार पचवूनसुद्धा फॅशन जगतात स्वतःला सिद्ध करण्याचे स्वप्न घेऊन अंजली लामा मुंबईला आली. दृढसंकल्प आणि कठोर मेहनतीच्या बळावर ‘लॅक्मे फॅशन विक एसएस२०१७’ मध्ये तिला संधी मिळाली आणि भारतातील पहिली ट्रान्सजेंडर (तृतीयपंथी) मॉडेल म्हणून तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारती गेहानीने (उद्योजक) आपल्या ध्येयाशी कुठेही तडजोड न करता आपल्या शारीरिक अपंगत्वाच्या आघातावर चढाई केली. राष्ट्रीय स्तरावरची ‘पॅरालंपिक बॅडमिंटन खेळाडू’ एवढ्यावरच ती थांबली नाही तर एक यशस्वी उद्योजक म्हणूनही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. ठरलेल्या साच्यापलीकडे जाऊन कलेची वाट निवडलेली कृतिका गिल (मेकअप आर्टिस्ट) आपल्या कामाबद्दल प्रचंड आत्मविश्वासू आहे. आजच्या समाजविघातक घटनांवर आपल्या विद्रोही गाण्यातून इंटरनेट विश्वाला हादरवून सोडणारी सोफिया अशरफ (कार्यकर्ती आणि रॅपर) वाईट प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवते.

शहरी स्त्रियांचे केवळ बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी नव्हे तर त्यांच्या जगण्याशी एकरूप होईल अशा फॅशनची स्त्रीविश्वाला ओळख करून देणे, हे स्वप्न घेऊन निव्वळ ३०० स्क्वेअर फिट जागेत १९९५ साली एण्ड च्या प्रवासाला सुरुवात झाली. भारतासारख्या परंपरेने वेढलेल्या समाजात अशा वेगळ्या वाटेवरचा प्रवास साधा-सरळ नक्कीच नव्हता. “मला खात्री आहे की मनात आणले तर स्त्रिया कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकतील. त्या आता पुरुषांच्या बरोबरीने चालल्या आहेत, मग ते कोणतेही क्षेत्र असो- खेळ, फॅशन, बिझनेस, इत्यादी. स्त्रिया आता क्रांतीच्या उंबरठ्यावर आहेत. त्या आता सत्ता हाती घेण्यास व त्यांना अपेक्षित असलेल्या समाजाची निर्मिती करण्यास सज्ज आहेत. हैशएण्डआईराइजच्या माध्यमातून आम्ही तिला प्रेरणा देणार आहोत, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला बळ देणार आहोत. ‘इतरांना जमू शकतं तर मग मला का नाही?’ ही जाणीव तिला करून देणार आहोत,” असे हाऊस ऑफ अनिता डोंगरेच्या मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर अनिता डोंगरे म्हणाल्या.

“एण्ड ही नेहमीच अशा स्त्रियांसोबत आहे ज्या पिढीजात मूल्यांना झुगारून लावतात. ही अतिशयोक्ती वाटेल पण मला खरंच विश्वास वाटतो की स्त्रिया जे ठरवतील ते प्रत्यक्षात उतरवू शकतील. मला असे दिसतेय की मी दिवसेंदिवस खूप वेगवेगळे व महत्त्वपूर्ण निर्णय घेतेय. मला वाटते एण्ड नेमके हेच आत्मभान देण्याचे – उर्जा देण्याचे काम करते,” असे करीना कपूर खान म्हणाली.

बिकट परिस्थितीही स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांची दखल घेण्याकरता हैशएण्डआईराइज ने एक पाऊल उचलले आहे. या निमिताने एण्ड काही प्रेरणादायी गोष्टीसुद्धा घेऊन येत आहे. जेणेकरून स्त्रीवर्ग प्रेरित होईल. त्याचबरोबर आपले स्वप्न साकार करायला त्या कार्यप्रवणसुद्धा होतील.