ब्रिन्टन फार्मास्युटिकल्सने फार्मा एक्सलन्स अॅवार्ड २०१८ मध्ये पटकावले तीन पुरस्कार

Share this News:

पुणे, २० फेब्रुवारी २०१८ : ब्रिन्टन फार्मास्युटिकल्स या भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल्स कंपनीने फार्मा एक्सलन्स अवार्ड २०१८ मध्ये तीन पारितोषिके पटकावली. त्यामुळे, फार्मा उद्योगातील या कंपनीच्या वेगवान वाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ब्रिन्टन फार्मास्युटिकल्सला ‘सर्वात उल्लेखनीय फार्मा कंपनी’ म्हणून गौरविण्यात आले आणि ‘द इमर्जिंग फार्मा कंपनी ऑफ द इयर’ म्हणूनही घोषित करण्यात आले. तसेच, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल दर्डा यांना ‘बिझनेस लीडर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला.

ब्रिन्टन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने सप्टेंबर २०१४ मध्ये भारतात आपले काम सुरू केले आणि एका वर्षाच्या आतच ती भारतातील त्वचाशास्त्र विभागातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मास्युटिकल कंपनी बनली. ब्रिन्टनच्या पिडिअॅट्रिक विभागातर्फे लहान बाळांचे पोषण, श्वसनाचे त्रास आणि इतर थेरपीसाठीची उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सध्या लहान बाळांचे पोषण, प्रोबायोटिक्स, बाल-मधुमेह, बाळांमधील हृदयविकार व इतर अनेक नावीन्यपूर्ण उत्पादने आणण्यासाठी ब्रिन्टनतर्फे संशोधन आणि विकासकार्य जोमाने सुरू आहे.

ब्रिन्टन फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राहुल दर्डा पुरस्कार स्वीकारताना म्हणाले की, वर्ल्ड हेल्थ अॅण्ड वेलनेस काँग्रेसमध्ये फार्मा एक्सलन्स अॅवार्ड २०१८ च्या सुरूवातीच्या टप्प्यावरच तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. असा सन्मान आपल्याला उत्कृष्ट उत्पादनांसाठी कार्य करण्यास प्रेरणा देतो आणि नवीन उपक्रमांचा आदर्श नमुना उभारण्यात मदत करतो आणि त्वचाशास्त्र व बालरोगशास्त्रातील अग्रेसर कंपनी म्हणून नावारुपास येण्यासाठी कंपनी सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.

मानाचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर, ब्रिन्टन फार्मास्युटिकल्सचे मार्केटींग डिरेक्टर विजेय क्रिस्टोफर म्हणाले की, “वर्ल्ड हेल्थ अँड वेलनेस काँग्रेसच्या अशा प्रतिष्ठित व जागतिक मान्यता प्राप्त पुरस्कारासाठी आम्ही आभारी आहोत. वर्तुळाबाहेर जाऊन डर्मा आणि पेडियाट्रिकमधील अभिनव उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानात लक्षणीयरीत्या गुंतवणूक केली होती. उत्तम उत्पादनांसाठी तांत्रिक अडथळ्यांना न जुमानण्याचे ब्रिन्टनच्या ध्येयावर / तत्त्वावर या पुरस्कारातून एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.”