गरजूंना मदत हाच शिवजयंतीचा संदेश – राहुल बग्गा

Share this News:

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कोथरूड शिवजयंती महोत्सवात आज एस एन डी टी कन्याशाळेतील २५ गरजू विध्यार्थीनीना गणवेश वाटप करण्यात आले.प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि इंडो ग्लोबल इंफ्रास्ट्रक्चर कंपनीचे संचालक राहुल बग्गा यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना श्री राहुल बग्गा म्हणाले ” गरजूंना मदत करणे हाच शिवजयंतीचा संदेश असून क्रिएटिव्ह फाउंडेशन ने या मुलींना गणवेश भेट देउन एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित अशी रयतेची सेवा केली आहे ”

महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलताना क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष व महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर म्हणाले ” कोणत्याही महनीय व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करताना सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो,यालाच अनुसरून शिवजयंतीतील कार्यक्रमाचा खर्च कमी करुन या शाळेतील विद्यार्थ्यांनीना आवश्यक असलेले गणवेश देण्याचा आम्ही निर्णय घेतला ” समाजातील सर्वच संस्था संघटना यांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवुन उपलब्ध निधी खर्च केल्यास उत्सवांचा आनंद द्विगुणित होइल आणि त्या त्या महनीय व्यक्तीने घालून दिलेल्या आदर्शाचे पालन देखील होइल.

पुढील शैक्षणिक वर्षात गुणवत्ता मिळविणाऱ्या ५ मुलींची शिक्षणाची सर्व जबाबदारी कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान व क्रिएटिव्ह फाउंडेशन घेइल असे महोत्सवाचे सह संयोजक विशाल भेलके यांनी जाहीर केले.
यावेळी उमेश भेलके,मंदार बलकवडे,सुरेश जपे,अक्षय मोरे,गणेश इंगळे,मंदार महाडिक राकेश शहा सतीश दिघे मंगेश कलाटे इ उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनावणे,मधुरा तांगडे,देवकर मॅडम व पालक प्रतिनिधी सोनाली मगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले,संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.