श्री बालाजी मंदिरमध्ये कल्याणोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
पुणे लष्कर भागातील सोलापूर बाजारमधील श्री बालाजी मंदिरमध्ये श्री जगतपिता भगवान बालाजी , लक्ष्मीजी , पद्मावती माता यांचा विवाह कल्याणोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला . यामध्ये श्री बालाजी देवाचा अभिषेक , पूजा व आरती करण्यात आली . त्यानंतर श्री विष्णुसहस्त्रनाम ,हवन , पूजा व आरती करण्यात आली . त्यानंतर बांगड्या भरणे व हळदीचा कार्यक्रम झाला . दुसऱ्यादिवशी श्री बालाजी , लक्ष्मीमाता , पद्मावती माता यांचा कल्याणोत्सव (शुभविवाह ) संपन्न झाला . त्यानंतर आरती करण्यात आली .
यावेळी भव्य रथयात्रा श्री बालाजी मंदिर पासून काढण्यात आली . अरिहंत गॅस एजन्सी , ब्लु स्टार मित्र मंडळ , महात्मा गांधी बसस्थानक , सोलापूर बाजार पोलीस चौकी , जैन मंदिर ते पुणे कॅन्टोन्मेंट कर्मचारी वसाहतीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली . त्यानंतर आरती करण्यात आली . त्यानंतर बालाजी भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला .
यावेळी पुणे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , शशिधर पुरम , विनायक काटकर , सुधीर यादव , शैलेंद्र बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन श्री बालाजी ग्रुपचे अध्यक्ष महेश जेधे व बालाजी भक्तांनी केले
