पुणे छावणी उपाध्यक्ष चषक “दि पुणे कॅम्प श्री २०१८” या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ” विनीत शिंदे ”  विजेता

Share this News:

दि पुणे कॅम्प फौंडेशन, व सिद्धार्थ तरुण मंडळ पुणे कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले,व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानावांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ शंकरसेठ रोडवरील गोळीबार मैदान या ठिकाणी पुणे छावणी उपाध्यक्ष चषक “दि पुणे कॅम्प श्री २०१८” या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,विनीत शिंदे या स्पर्धकाने मुख्य ‘किताब दि पुणे कॅम्प श्री २०१८ पटकावला, स्पर्धेतील जलद प्रगतिशील स्पर्धकाचा मान राहुल कदम याला मिळाला तर, नवोदित शरीरसौष्ठपटूचा मान विशाल दिघे याला मिळाला तर स्पर्धेतील बेस्ट पोझर चा ‘किताब अतुल साळुंके याने पटकावला ,तत्पूर्वी मिस्टर वर्ल्ड महेंद्र चव्हाण यांची शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिके सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन पुणे छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर मा राजीव सेठी यांनी केले , यावेळेस कार्यक्रमाचे मुख्य संयोजक पुणे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष नगरसेवक अतुल गायकवाड , विक्रम मोरे, पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे , मिलिंद अहिरे , मनजितसिंग विरदी , नगरसेवक विनोद मथुरावाला, नगरसेवक दिलीप गिरमकर, भगवान गायकवाड , संदीप सातव , मछिंद्र सातव , अविनाश सातव , पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष शरदअण्णा चव्हाण , वसंतमामा साळवे , श्याम सहानी , सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित घुगे , माजी नगरसेवक शैलेंद्र बीडकर , नगरसेवक योगेश समेळ , विष्णू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते, मुख्य बक्षीस वितरण पुणे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष नगरसेवक अतुल गायकवाड, व दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे चिरंजीव अंकित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला, स्पर्धेचे संयोजन विक्रम मोरे, डॉ अनिरुद्ध संकपाळ,नवीन भोसले, संजय कांबळे , इम्तियाज मोतीवाला, योगेश कंडारे, अजय गायकवाड यांनी केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दि पुणे कॅम्प फौंडेशन व सिद्धार्थ तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.