पीआरसीआय आयोजित १२ वा ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह पुण्यात संपन्न

Share this News:

पुणे, १० मार्च २०१८ : सांस्कृतिक पुणे अशी ओळख कायम असलेल्या शहरात जागतिक संवादमाध्यम तज्ज्ञांच्या समिती सदस्यांनी आयोजित केलेला बारावा ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फेसबुक या सुप्रसिद्ध कंपनीचे आशिया पॅसिफिक प्रमुख रमेश गोपाळकृष्णा यांनी या माध्यमातून करण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगांची माहिती दिली. यावेळी पब्लिक रिलेशन्स कॉउंसिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना उत्कृष्ट कार्यासाठी मानचिन्ह आणि प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

फेसबुकचे आशिया पॅसिफिक प्रमुख रमेश गोपाळकृष्णा म्हणाले की, एका दिवशी ३ दशलक्ष व्हीडिओ फेसबुकवर नव्याने अपलोड होतात आणि तेवढे जगभरातील लोक बघतात. त्यामुळे आपण या माध्यमातून आपले व्यवसाय, विविध सामाजिक संस्थांचे उद्देश नव्या पद्धतीने मांडू शकता. फेसबुक वर्कप्लेस हे माध्यम वापरून सीसीटीव्ही प्रमाणे ऑफिसच्या अतिमहत्त्वाच्या प्लान्ट्समधील लाइव्ह स्टेटस जाणून घेण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आली आहे. तसेच आपल्या कंपनीच्या आवश्यकतांनुसार कस्टमाइज डिझाईन करण्याची सुविधा या नव्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली आहे. फेसबुक हे फक्त मुक्तसंवादाचे माध्यम नसून आपल्या उद्दिष्टांपर्यंत सहज व कमी कष्टात पोहचण्यासाठी सहाय्यक ठरत असलेले आघाडीचे माध्यम ठरत आहे. पुढे जाऊन इमेल या पद्धतीला खात्रीशीर पर्याय म्हणून फेसबुकवर विशेष सुविधा व्यावसायिकांच्या दृष्टीने देण्याचा विचार कंपनी करत आहे. पुणे शहर अनेक आंतरराष्ट्रीय उद्योगांना आपल्यात सामावून घेत आहे त्यामुळे येत्या काळात हे शहर उद्योग नगरी म्हणून विशेष ओळख प्राप्त करेल.

रास्ता पेठेतील शांताई हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अनावरण दीपप्रज्वलन करून फेसबुक आशिया पॅसिफिक प्रमुख रमेश गोपाळकृष्णा, पीआरसीआयचे प्रेसिडेंट-नॅशनल एक्सिक्युटीव्ह बीएन कुमार, पीआरसीआयचे सेक्रेटरी जनरल प्रकाश दुबे, कोचीन शिपयार्डचे जनरल मॅनेजर राजेश गोपाळकृष्णन् आणि उपस्थित मान्यवरांनी केले. यानंतर सिम्बायोसिसच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली. अनावरण कार्यक्रमावेळी चाणक्य या नियतकालिकाचे अनावरण रमेश गोपाळकृष्णा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारत व इतर देशातील अनेक संवाद माध्यम क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी जगभरातून उपस्थित होते.

या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हमध्ये विविध क्षेत्रातील २० मान्यवरांनी त्यांचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. यामध्ये फेसबुक कंपनीचे आशिया पॅसिफिक प्रमुख रमेश गोपाळकृष्णा, थिंक एनर्जी या सौर ऊर्जा प्रकल्पावर काम करणार्‍या भारतातील अग्रणी कंपनीचे संदिप अग्रवाल, आयआयटीचे शैलेंद्र अगरवाल, नासकॉमचे माजी अध्यक्ष जयतीर्थ राव सेवालय संस्थेचे रवी बापटले असे मान्यवर उपस्थित होते. संवाद सत्रावेळी तंत्रज्ञान, नवी माध्यमे, एचआयव्हीग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी प्रसारमाध्यम व स्थानिकांच्या सहभागाने सामान्य विद्यार्थ्यांसह सर्वसमावेशक शिक्षण घेण्याची संधी अशा अनेक विषयांवर उपस्थित मान्यवरांनी संवाद साधला.

या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शेवटच्या सत्रात पब्लिक रिलेशन्स कॉउंसिल ऑफ इंडिया (पीआरसीआय) यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना उत्कृष्ट कार्यासाठी मानचिन्ह आणि प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

· कॉर्पोरेट सिटीझन ऑफ द इअर – कोचीन शिपयार्ड लि. कोचीन
· ऑर्गनारझेशन ऑफ द इअर- पब्लिक रिलेशन्स – सीएमएस इन्फोसिस्टीम लि, बेंगळुरू
· ऑर्गनारझेशन ऑफ द इअर- स्वास्थ्य व आरोग्य – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि, मुंबई
· मीडिया पर्सनॅलिटी ऑफ इयर – इलेक्ट्रॉनिक मीडिया – चंद्रमोहन पुपाला
· मीडिया पर्सनॅलिटी ऑफ इयर – प्रिंट मीडिया – बरुन झा
· कॉर्पोरेट यंग लीडरशीप – संदिप अगरवाल
· आशियाई भारतीय – भारतातील विशेष योगदान – स्टॅन्ली डॅनियल, दुबई
· कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी – एस कृष्णाप्पा
· उत्कृष्ट संवादक कॉर्पोरेट – ज्योती कुमार, गेल इंडिया (इंडिया) लि
· उत्कृष्ट संवादक इंटर्नल – रेणू करकाल, इंडियन ऑइल
· उत्कृष्ट संवादक – ह्युमन रिसोर्स – प्रा आर एस एस मणी
· उत्कृष्ट संवादक – मार्केटिंग कम्युनिकेशन – अजय ककर
· उत्कृष्ट संवादक – जनसंपर्क – देवेंद्र भुजबळ, मुंबई
· उत्कृष्ट संवादक – ऑपरेशन्स मॅनेजर – बी के सिंग
· उत्कृष्ट संवादक – फिल्म – अमित खन्ना
· उत्कृष्ट संवादक – साहित्य – वर्षा सेशन
· उत्कृष्ट संवादक – कला संस्कृती – डॉ चुडामणी नागगोपाल
· उत्कृष्ट संवादक – क्रीडा संवाद – नुपूर महाजन – ओडिसा राज्य शासन
· उत्कृष्ट संवादक – आपत्ती व्यवस्थापन – संजय त्रिपाठी – इंडियन ऑइल, उत्तर व ईशान्य विभाग
· उत्कृष्ट संवादक – स्टॅटेजिक कम्युनिकेशन्स – अलोक कुमार सिंग
· उत्कृष्ट संवादक – फायनान्शियल कम्युनिकेशन्स – जी श्रीनिवासन्
· कम्युनिकेशन आयडिया ऑफ दोन इयर –
· टेफ – ट्रॅक्टर अॅड फार्म इक्विपमेंट लि
· कर्नाटक राज्य रस्ते बांधकाम विभाग
· यंग व्हिजनरी – सायली करंजकर – पेसेन्स
· जनसंपर्क क्षेत्रात सर्वाधिक विश्वसनीय व्यक्ती – राहुल टेकवानी – कॉन्सेप्ट पीआर
· मास कम्युनिकेशन ट्रेनर – डॉ माधवी रेड्डी, पुणे विद्यापीठ
· मास कम्युनिकेशन इन्स्टिटय़ूट – सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे
· एन जी ओ ऑफ द इयर –
· सेवालय लातूर
· स्माईल
· पी आर एजन्सी – अॅडफॅक्टर पी आर
· मोस्ट प्रॉमिसिंग पी आर एजन्सी ऑफ द इयर – महाराष्ट्र मीडिया सर्विसेस एंड पी आर प्रा. लि. पुणे.
· बिझनेस स्कूल
· एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
· इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अँड जर्नालिझम स्वित्झर्लंड
· लाइफटाइम अचीवर्स अवॉर्ड फॉर प्रमोटिंग पी आर – के आर अशोक कुमार
· ज्युरीज् स्पेशल
· प्रवीण मुधोळकर – न्यूज 18, ब्युरो चीफ, कम्युनिकेशन
· प्रीतम शर्मा – शर्मन कम्युनिकेशन
· विश्वजीत दास – सामाजिक कार्य विशेष संवाद
· सादिया फारूख – पी आर कन्सल्टंट
· प्रा के के रट्टू – साहित्य जनसंपर्क
· राजीव राठोड – उत्तम पर्यावरण

· एनडी राजपाल मेमोरिअल – कम्युनिकेटर ऑफ डिकेड – रोमा बलवानी
· डॉ नदीग कृष्णमूर्ती मेमोरियल – एक्सलन्स इन जर्नालिझम अँड कम्युनिकेशन – जी उलगनाथन
· डॉ के आर सिंग मेमोरियल लाइफटाइम अचिव्हमेंट फॉर कम्युनिकेशन – मदन बहल
· डॉ अनिल बासू मेमोरियल – पब्लिक रिलेशन्स – सुशील बहल
· डॉ एम व्ही कामथ मेमोरियल – एक्सलन्स इन जर्नालिझम – प्रकाश दुबे