शिबू-अभिजीत ‘लगी तोछगी’साठी पुन्हा एकत्र

Share this News:

चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशीकाही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठीसिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरीनजर मारली तरी या गोष्टीची जाणीव होते.अशीच एककलाकारदिग्दर्शकाची जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्याभेटीला येणार आहे. सध्या छोटया पडद्यावर गाजत असलेलाअभिनेतादिग्दर्शक अभिजीत साटम पुन्हा एकदा मोठयापडद्याकडे वळला आहे. दिग्दर्शक शिबू म्हणजेच शिवदर्शनसाबळेच्या लगी तो छगी या आगामी मराठी सिनेमात तोमुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शिवदर्शनच्या कॅनव्हासमध्ये त्याने महत्त्वपूर्णभूमिका साकारली होती. त्यापूर्वा अभिजीतने हिंदीसिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. आता लगी तोछगीच्या निमित्ताने शिबू आणि अभिजीत पुन्हा एकत्रआलेआहेत. निर्माते शिवदर्शन साबळे, अजित पाटील, दिप्ती विचारेआणि स्वाती फडतरे यांनी या सिनेमाची निर्मिती केलीआहे.‘कॅनव्हास’, ‘अजब लग्नाची गजब गोष्ट या चित्रपटांनंतरमध्यंतरीच्या काळात शॉर्टफिल्म्स आणि नाटकांमध्ये बिझीअसलेला शिबू लगी तो छगीद्वारे पुन्हा एकदा मोठयापडद्याकडे वळला आहे. शिवदर्शनची खरी ओळख सांगायचीतर तो सुप्रसिद्ध शाहिर साबळे यांचा नातू. आजोबा शाहिरसाबळे तसेच वडिल देवदत्त साबळे ही मराठीतील दोन दिग्गजव्यक्तिमत्त्वे मागे असतानाही शिवदर्शनने आतापर्यंतस्वबळावरच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलाआहे.

अभिजीत चांगला मित्र तर आहेच, पण एक उत्तमअभिनेताही असल्याने तो या चित्रपटामधील भूमिकाअगदीप्रामाणिकपणे साकारू शकतो याची खात्री असल्यानेच त्याचीया सिनेमासाठी निवड केल्याचं शिबू म्हणाला. प्रवाहापेक्षावेगळया गोष्टी हाताळणाऱ्या शिबूने या वेळेसही कॉमेडीसस्पेन्सथ्रीलर अशा तिन्ही जॉनरला हात घालणारा हा एकअनोखा प्रयत्न केला आहे. शिबूच्या मते प्रेक्षकांना यासिनेमाद्वारे एक वेगळा अनुभव मिळेल.

दिग्दर्शनासोबतच शिवदर्शनने हेमराज साबलेंच्यासाथीने या सिनेमाचं लेखनही केलं आहे. अभिजीतसोबत यासिनेमात निकीता गिरीधर, रविंदर सिंग बक्षी, मिलिंद उके, योगेश सोमण, असित रेडीज, शैला काणेकर, राजू बावडेकर, सागर आठलेकर, महेश सुभेदार, अक्षय भोसले आणि सुरेंदरपाल आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना अनुराग गोडबोले यानेस्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचं एक वैशिष्टय म्हणजेशिबूचे वडील देवदत्त साबळे यांनी 40 वर्षांपूर्वा लिहिलेलंआणि संगीतबद्धकेलेलं एक गाणं प्रेक्षकांना या चित्रपटामध्येऐकायला मिळणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते कॉस्च्युमडिझाइनर सचिन लोव्हलेकर यांनी या सिनेमातीलव्यक्तिरेखांसाठी कॉस्च्युम डिझाइन केले आहेत. अपूर्वामोतीवालेसहाय आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन, तरकॅमेरामन प्रदिप खानविलकर यांनी छायालेखन केलं आहे.