एनर्जी’ या चित्रप्रदर्शनाला आजपासून पुण्यात सुरुवात

Share this News:

आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते अनादी काळापासून मनुष्याशी निगडीत आहेत. हीच पाच तत्वे स्प्रे पेंटिंगच्या माध्यमातून चित्रकार निलेश पवार यांनी आपल्या चित्रांमधून आपल्या समोर आणली आहेत. ‘एनर्जी’ या त्यांच्या चित्रप्रदर्शनातून ही चित्रे अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. आज अमर आणि शुभांगी मांजरेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. चित्रकार निलेश पवार, संध्या पवार, सुनीता कोलते, शीतल काळभोर, शुभादा रणदिवे, सुनील व करुणा चावला, संजीव व प्रियंवदा पवार आदी यावेळी उपस्थित होते. भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे गॅलरी येथे सकाळी ११ ते सायं ६.३० वाजेपर्यंत येत्या रविवार २७ मे पर्यंत सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.