शहरातील सर्व पेट्रोल पंपावर आंदोलन करु…..वैशाली काळभोर
पिंपरी, पुणे (दि. 24 मे 2018) युपीए सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरची एक, दोन रुपये भाववाढ झाली तरी डोक्यावर सिलेंडर घेऊन नाचणा-या सुषमा स्वराज आणि स्मृती ईराणी आता गप्प का? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी उपस्थित केला. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटर परिसरात दारु विक्रीस बंदी केल्यानंतर राज्यातील जनतेवर तीन रुपये प्रति लिटर पेट्रोल दरवाढ लादण्यात आली होती. यानंतर कायद्यात बदल करुन शहरांतील सर्व महामार्गांवर दारु विक्रीस परवानगी देण्यात आली. तरी देखील पेट्रोल वरील दारुचा अधिभार अद्याप रद्द केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सर्वात जास्त दराने पेट्रोल, डिझेल खरेदी करावे लागते. हि दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी काळभोर यांनी केली.
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 24 मे 2018) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेता दत्ता साने, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका संगिता ताम्हाणे, गीता मंचरकर, निकीता कदम, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, वंदना पिंपळे, मनिषा गटकळ, शिला भोंडवे, प्रिती मोकाशी, संघटिका कविता खराडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, लता ओव्हाळ, संगीता कोकणे, मीनाक्षी उंबरकर, मीरा कुदळे, पल्लवी पांढरे, पौर्णिमा पालेकर, संयोजिता दोडके, तिऊ साह, अनिता गायकवाड, जयश्री पाटील, शितल जाधव, संगीता जाधव, दिपाली देशमुख, सुनंदा काटे, रुपाली गायकवाड, अश्विनी पोळ, प्रेमा शेवाळे, नलिनी शेडगे, अरुणा कुंभार, आशा शिंदे, अदिती क्षेत्री, माऊली जाधव आदी उपस्थित होते. यावेळी मोदी सरकार विरोधात व भाववाढी विरोधात उपस्थितांनी घोषणा दिल्या.
काळभोर म्हणाल्या की, मोदी सरकारने सलग अकरा दिवस पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली. कर्नाटक राज्यात सत्ता न मिळाल्यामुळे देशभरातील जनतेवर हे सरकार भाववाढ करुन वचपा काढत आहे की काय? या भाववाढीमुळे गृहीणींना कुटूंबाचा मासिक खर्च भागविणे अशक्य झाले आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीचा परिणाम वाहतूक, शेती उत्पादनांबरोबरच या कामगार नगरीतील रोजंदारी व कायम पगारी नोकरदार वर्ग, छोटे व्यावसायिक अशा सर्वच घटकांवर होत आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणावे. रोज सकाळी भाववाढ करण्याऐवजी सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याप्रमाणे वर्षातून दोनवेळा दर निश्चित करावा. हि जुलमी भाववाढ कमी केली नाही तर, आगामी काळात शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर ‘अच्छे दिनच्या विरोधात’गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करु असा इशारा काळभोर यांनी दिला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, युपीए सरकारच्या कार्यकाळात आंतराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाचे दर अनिश्चित असतानाही पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर नियंत्रणात होते. मोदी सरकारने मात्र, देशातील सव्वाशे कोटी जनतेला रोज सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदरच ‘अच्छे दिनाचे बक्षिस म्हणून पेट्रोल, डिझेलची भाववाढ’ मागील चार वर्षात दिली. चार वर्षापुर्वी देशभर ‘बहुत हुई जनता पर पेट्रोल – डिजल की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी देशभर जाहीरात करणारे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान आता मुग गिळून गप्प का असा प्रश्न देशातील जनता विचारत आहे अशी टिका वाघेरे पाटील यांनी यावेळी केली.
