कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना राज्यातील 97 हजार ग्राहकांना लाभ घेता येणार

Share this News:

वीज बिल भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीतकरण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासादेण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेतसहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मुळ थकबाकीवरील व्याज विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 97हजार 464 औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल त्याद्वारे सुमारे 231 कोटीचा व्याज विलंब आकारावरील सवलतमिळवता येईल.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपूरवठा कायमस्वरुपीखंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने दि. 1जून 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी अभययोजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा दि. 31डिसेंबर 2017 पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. अशाग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मुळ थकबाकीची रक्कमभरल्यास त्यांना 100 टक्के व्याज विलंब आकाराची सवलतमिळणार आहे. दि. 1 जूलै 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 यादरम्यान ग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम व्याजाची 25 टक्केरक्कम भरली तर उर्वरित 75 टक्के व्याज 100 टक्के विलंबआकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.

जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षापेक्षा अधिकचे असेल न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनीडिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला 100 टक्केव्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12वर्षेपर्यंतचे आहे न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे. अशाग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना 50 टक्केव्याजमाफीची सूट मिळणार आहे. यासर्व प्रकरणात न्यायालयीनप्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.

ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेटपेमेंट/चेक यामाध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतरमहावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यातयेईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्यारकमेची माहिती घ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी महावितरणचेअधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in यावरील‘AMNESTY SCHEME 2018 या लिंकवर जावून ग्राहक क्रमांक बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची ग्राहकाच्या थकबाकीचीसंपुर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत दि. 1 जून 2018 पासूनग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीतऔद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहावितरणने केले आहे.