रावेत जलउपसा केंद्रातील अंतर्गत  बिघाडामुळेच वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत

Share this News:

पुणे, दि. 30 जून 2018 : रावेत येथील जलउपसा केंद्रातील अंतर्गत विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी (दि. 26) पहाटे अडीच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून या जलउपसा केंद्राला सुरळीत वीजपुरवठा सुरु होता.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी (दि. 26) रावेत जलउपसा केंद्राचा सुमारे अडीच तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. परंतु या केंद्रातील लाईटींग अरेस्टर फुटल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्ही वाहिनीची वीजपुरवठा दोन वेळा एकूण 9 मिनिटांसाठी खंडित राहिला होता. तथापि जलउपसा केंद्रातील वीजमीटरनंतरच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेसह रोहित्रात बिघाड झाल्यामुळे अडीच तास वीजपुरवठा खंडित होता. त्याचा महावितरणशी संबंध नाही.

महावितरणकडून रावेत जल उपसा केंद्राला एक्सप्रेस वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या वाहिनीवरुन वीज खंडित झाल्यास अन्य पर्यायी वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध आहे. तथापि, रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा या केंद्रातील अंतर्गत वीजयंत्रणेमधील बिघाडामुळे खंडित झाला होता.