अर्थकारणातील दोष दूर करण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन.
पुणे, दि. २ जुलै : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाहीये. त्यामुळे संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असून समाज्यातील सुज्ञ नागरिकांना एकत्र करण्यासाठी त्यांच्या मतांना, विचारांना विचारपीठ देण्यासाठी संभाजी ब्रिगेड एक अनोखा उपक्रम राबवत “निबंध स्पर्धा” आयोजित केली आहे.
अर्थकारणातील दोष दूर करण्यासाठी तसेच लोकांमधील नाराजीला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याकरिता हि स्पर्धा आयोजित केली असल्याचे संभाजी बिग्रेडचे आर्थिक प्रदेश समन्वयक प्रभाकर कोंढाळकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.
ज्या लोकांनी कर्ज घेतले आहेत अथवा जमीनदार झालेले आहेत असे लोक व सर्वसामान्य नागरिकांना देखील या निबंध स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आले आहे. यासाठी
प्रभाकर मारुती कोंढाळकर
रा. वि/१, मुक्तानंद सोसायटी, धनकवडी,चव्हाण नगर, पुणे ४११०४३ या पत्त्यावरअथवा prabhakar.kondhalkar@
यावेळी पत्रकार परिषदेत सुरेखा जुजगर,विजय पांडव, सुभाष जाधव, संतोष भंडारी,सनी थोपटे, संदीप लहाने, संतोष घाडगे,महादेव माथेरे, राजेंद्र परदेशी व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेचे विषय
१. स्विस बँक, पनामा, पॅराडाईज या विदेशातील बँकेमधील ज्या भारतीयांनी काळा पैसा लपविला आहे. त्या व्यक्तींची नावे घोषित करावी. व त्यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी हे होईपर्यंत कर्जदारांनी कर्ज भरावे का?
२. राष्ट्रीयकृत बँकेमधून ज्या मोठ्या उद्योगपतींना कर्ज दिली व ती कर्जे थकीत आहे. जोपर्यंत सरकार हि कर्जे वसूल करीत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज भरावे का?
३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन दिले होते कि विदेशातील बँकांमध्ये भारतीयांनी लपविलेला काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या खात्यांमध्ये पंधरा लाख रुपये जमा करून असे आश्वासन दिले होते. याउलट मागील चार वर्षात स्विस बँकेतील काळ्या पैशामध्ये ५०% टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. जो पर्यंत प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये सरकार जमा करत नाही तो पर्यंत आम्ही कर्ज भरावे का?
४. आपल्या भारतीयांचा कष्टाचा, घामाचा,रक्ताचा काळा पैसा मूठभर लोकांनी विदेशातील बँकांमध्ये ठेवू नये, याबाबत कर्जदार, जमीनदार, सर्वसामान्य जनतेने एकत्र येणे जरुरीचे आहे का?
