– अग्निशमन दलाने जोखीम पत्करत अडकलेल्या मांजरीची केली सुखरुप सुटका.
पुणे : गेल्या तीन दिवसापासुन एक मांजर बिल्डिंगमधे तिसऱ्या व चौथ्या मजल्याच्या मधोमध बसली होती. स्थानिक नागरिकांनी प्रयत्न करुनदेखील त्यांना त्या मांजराची सुटका करता आली नाही. शेवटी आज दुपारी ४ वाजता नागरिकांनी अग्निशमन दलाला वर्दि दिली.



दलाचे जवान पोहोचताच त्यांनी प्रथम सर्व अंदाज घेतला व मांजरीची कशी सुटका करता येईल याबाबत शक्कल लढवत प्रयत्न सुरु केले. दलाचे तांडेल राजाराम केदारी हे दुसऱ्या बिल्डिंगच्या टेरेसवर गेले त्याचवेळी इतर काही जवानांनी गॅलरीमधून रशी टाकली व ती रशी केदारी यांनी कमरेला बांधत अत्यंत जोखमीने ते त्या मांजरीजवळ येऊन तिच्या मानेजवळ तारेने एक फासागाठ टाकून तिची सुखरुप सुटका केली.
या कामगिरीमधे दलाचे उपकेंद्र प्रमुख सुभाष भिलारे , फायर ईंजिन ड्रायव्हर हनुमंत कोळी , तांडेल राजाराम केदारी तसेच फायरमन कैलास शिंदे , रफिक शेख , मंगेश मिळवणे , संदिप पवार , अर्जुन यादव यांनी सहभाग घेतला.
