Pune

Gleneagles Global Hospitals and Vaso-Meditech Pvt. Ltd. launch India’s first ever ‘Advanced Heart Failure Treatment Program’ with an aim to spread awareness on heart treatments available in the country and to start India’s First Online Heart Failure Registry

वीजचोरी प्रकरणी दोषीस एक वर्ष कारावास व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा

मुंबई, दि. 16 जून 2017 : वीजचोरी प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातीलशहादा येथील विनायक निंबा पवार यास शहादासत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कारावासव 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिनेकारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.  नंदुरबार येथील महावितरणचे भरारीपथक तपासणी करीत असताना त्यांना शहादायेथील विनायक निंबा पवारच्या वीजमीटरमध्येफेरफार केल्याचे निदर्शनास आले. त्यावरूनभरारी पथकाचे तत्कालीन उपकार्यकारीअभियंता श्री. बी.एस. तायडे यांनी पवारविरुध्दविद्युत अधिनियम 2003 चे कलम 135 (1)(ब) नुसार महावितरणच्या नाशिक पोलीसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. डिसेंबर 2011मध्ये ही कारवाई करण्यात आली.  या प्रकरणी विनायक पवारने वीजचोरी केल्याचेसिध्द झाल्याने त्यास शहादा सत्र न्यायालयानेदोषी ठरवून एक वर्ष कारावास व 16 हजाररुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे व दंड नभरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाचीशिक्षा भोगावी लागणार आहे.