Illegal liqour worth Rs 3.75 lakh seized 

Share this News:

परराज्य निर्मित अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या तस्करांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

    दि.२७/०४/२०१७ रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग पुणे कार्यालयाच्या पथकाने परराज्य निर्मित अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली असून सदरची कारवाई मरकळ गावचे हद्दीत आळंदी लोणीकंद रोड वर  करण्यात आली.

सविस्तर वृत्त – निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग पुणे या कार्यालयाकडून मा.सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचे आदेशान्वये दि.१ एप्रिल २०१७ पासून राष्ट्रीय / राज्य महामार्गा नजीकच्या ५०० मीटर अंतराच्या आतील अबकारी अनुज्ञप्त्या बंद करण्यात आलेल्या असल्याने अवैध रित्या मद्य विक्री होऊ नये या करिता राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून जागोजागी गस्त घालण्यात येत आहे अश्याच प्रकारे गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहन जाताना दिसल्यामुळे सदरचे वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात  विदेशी मद्याचे १८० मि.लि.क्षमतेच्या बाटल्यांचे ३ बॉक्स (१४४ बाटल्या) मिळून आले. सदरचे चार चाकी एन्जोय वाहन क्र. एमएच १२ के एन १५२२ या वाहनातून अवैधरीत्या मद्य वाहतूक करत असताना मिळून आल्याने आरोपी राजू नामदेव धोत्रे यास अटक करून वाहनासह मुद्देमाल जप्त करून गु.रा.क्र.७१/१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याबाबत पुढील तपास केला असता साविंदणे ढगे वस्ती ता.शिरूर जि.पुणे येथे आरोपीचे राहते घरातून मध्य प्रदेश निर्मितीचे ७५० मि.लि. ९८ गोवा व बॉम्बे ब्रंड असलेल्या बाटल्या, १८० मि.लि. च्या २३९ रिफिलिंग भरलेल्या सिलबंद बाटल्या,१८० मि.लि. च्या १९० रिकाम्या काचेच्या बाटल्या तसेच वेगवेगळ्या ब्रंड ची ५२० नग बुचे जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या वाहनाची अं.किं.रु.३,००,०००/- व इतर मद्य,बुचे यांची अं.किं.रु.७६५००/- अशी एकूण मुद्देमालाची किंमत ३,७६,५००/- एवढी आहे.सदरची कारवाई विभागीय उपायुक्त श्री.अर्जुन ओहोळ अधीक्षक पुणे श्री.मोहन वर्दे व उपअधीक्षक श्री.सुनील फुलपगार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक परब, उपनिरीक्षक श्री.संजय सराफ,श्री.नरेद्र होलमुखे सहाय्यक दुय्यम निरीक्षक रविंद्र भूमकर जवान सर्वश्री.अतुल बारंगुळे, प्रमोद पालवे, संतोष गायकवाड, शिवाजी गळवे यांच्या पथकाने कारवाई केली.सदर गुन्ह्या बाबत श्री.संतोष गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक श्री.नरेद्र होलमुखे हे करत आहेत.