एमपीएससीच्या समांतर आरक्षणावर तोडगा काढु – राज्यमंत्री दिलीप कांबळे

Share this News:
युवा जनता दल युनायटेड च्या शिष्टमंडळाने एमपीएससी च्या समांतर अारक्षणा संदर्भात अाज समाजकल्याण राज्यमंञी दिलीप कांबळे यांची भेट घेतली. यावेळी कुलदीप अांबेकर (प्रदेश सरचिटणीस युवा जेडीयु) यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात अाले. यावेळी,राकेश नेवासकर,निलेश निंबाळकर,फैय्याज ईनामदार उपस्थितीत होते.
यावेळी दिलिप कांबळे म्हणाले – 2 जानेवारी रोजी तुमची भेट मा. मुख्यमंत्र्यांशी करुन देतो. तुमचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी निश्चित प्रयत्न करेल. तुमच्यावर कसल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. तुम्ही अभ्यास करा, माझ्याकडुन सर्वतोपरी मदत केली जाईल.
यावेळी मनिषा सानप, ज्योती किसवे या विद्यार्थिनींनी अापली व्यथा राज्यमंत्री कांबळे यांच्याकडे व्यक्त केली.