‘डीएसके मास्टर प्लॅन’या योजनेला
पुणे, ता. 8 : डीएसके डेव्हलपर्सतर्फे आयोजित ‘डीएसके मास्टर प्लॅन’ हे गृहप्रदर्शन बी. जे. एस. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर थाटात सुरु
झाले. सकाळपासूनच ग्राहकांनी या योजनेतून आवडीच्या घरांचे बुकींग करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. येत्या रविवारपर्यंत (ता. 13) हे
प्रदर्शन खुले असेल.
या प्रदर्शनात खास डीएसके शैलीतील फ्लॅट उपलब्ध आहेत. डीएसके ड्रीमसिटी येथे असलेले ब्रीझ रेसिडन्स आणि वॉटरफॉल रेसिडन्स,
मगरपट्टा रोड येथे असलेला वेदांत, डीएसके विश्व मधील टी-३५ आणि नभांगण आणि मुंबई मधील मधुकोष या ६ प्रिमियम प्रकल्पांचे
पर्याय ग्राहकांसाठी आज पासून खुले करून देण्यात आले आहेत.
”आपलेही एखादे सुंदर घर असावे असे प्रत्येकालाच वाटते. पण बँक लोनमुळे तब्बल २० -२५ वर्ष इएमआय भरावे लागते शिवाय बँकेला
जास्तीचे व्याजही द्यावे लागते. त्यामुळे अनेकजण स्वत: चे घर घेण्यास धाडस करत नाहीत म्हणूनच या गोष्टींवर आम्ही खूप विचार
करून मास्टर प्लॅन तयार केला ज्यामध्ये २० वर्षांऐवजी फक्त सव्वा आठ वर्ष बँक लोन भरायचे जेणे करून ग्राहकांचे बँकेला ज्यादा जाणारे
व्याज वाचू शकेल.”अशी भावना प्रख्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
या प्रदर्शनात २५ स्टॉल असून त्यात डीएसके ड्रीमसिटी येथील हे प्रदर्शन ८ ते १३ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ७
वाजेपर्यंत सुरु राहील. त्याचप्रमाणे गृहकर्ज सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी टाटा कॅपिटल यांच्याकडून गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात
आले आहे. याशिवाय ग्राहकांना प्रत्यक्ष साईटवर जाऊन आपल्या आवडत्या प्रकल्पाला भेट देण्याची सुविधाही येथे उपलब्ध करून
देण्यात आल्यामुळे ग्राहक खुशीत दिसत होते.
या योजनेत फ्लॅट बुक करणारे ग्राहक योगेश देशमुख म्हणाले, ” डीएसकेंकडेच फ्लॅट बुक करायचा होता. प्रामाणिकपणा, कामाची उत्तम
गुणवत्ता, आणि मास्टर प्लॅन सारखी अफलातून योजना यामुळेच या प्रदर्शनात सहभाग घेतला.”
