पुण्यातही अभाविपकडून केरळ सरकारचा निषेध

Share this News:

केरळ मध्ये अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज अभाविप पुणे महानगरातर्फे कम्युनिस्ट पार्टीचा, (CPI_M) तसेच केरळ सरकारचा निषेध करण्यात येऊन, हत्त्या झालेल्या अभाविप आणि रा. स्व. संघ कार्यकर्त्यांना गुडलक चौक, डेक्कन येथे श्रद्धांजली देण्यात आली.
केरळ मध्ये १९६६ पासून अभाविप आणि रा. स्व. संघ कार्यकर्त्यांच्या हत्येचे सत्र आजतागायत मोठ्या प्रमाणावर सुरु असून ह्या हत्त्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचे आयोजन अभाविप कडून थिरूवअनंतपूरम येथे करण्यात आलेले होते. थिरूवअनंतपूरम येथील भव्य मोर्चात संपूर्ण देशभरातून आज ५०,००० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झालेले होते. मागील ५१ वर्षांपासून कम्युनिस्ट पार्टीने (CPI_M) अभाविप आणि रा. स्व. संघ कार्यकर्त्यांच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या सातत्याने घडून येत आहेत. ह्या हत्त्येच्या निषेधार्थ अभाविप पुणे महानगरातर्फे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा (CPI_M), तसेच केरळ सरकारचा निषेध करण्यात येऊन, हत्त्या झालेल्या अभाविप आणि रा. स्व. संघ कार्यकर्त्यांना गुडलक चौक, डेक्कन येथे श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अभिजीत पाटील, मध्य पुणे नगरमंत्री प्रतिक गुधाटे, महाविद्यालय प्रमुख अद्वैत पत्की, किरण खोजे, प्रियांका नागतिळक सह २८ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.