फक्त मराठीच्या होम थिएटरवर चित्रपटांची मेजवानी

Share this News:

मल्टिप्लेक्समधला सिनेमा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता घरबसल्या हा आनंद घ्यायची संधी फक्त मराठी वाहिनीने होम थिएटरच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. फक्त मराठीच्या होम थिएटरवर १७ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान रंजक मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घेता येणार आहे.

‘खबरदार’, ‘जत्रा’, ‘फुल ३ धमाल, ‘आई नंबर वन’, ‘जबरदस्त’, ‘सुपरस्टार’ या धमाल चित्रपटांचा आस्वाद फक्त मराठीवर पहिल्यांदाच घेता येईल. दररोज सकाळी ११.३० वा. व सायंकाळी ७.३० वा. हे चित्रपट रसिकांना पहाता येतील. फक्त मराठीवर पहिल्यांदाच दाखवण्यात येणारे हे प्रीमियर चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतील.