ब्ल्यू एअर तर्फे इन कार एअर प्युरिफिकेशन साठी केबिन एअर ची सुरूवात
अधिक सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी स्विडिश तंत्रज्ञान
मुंबई, १६ फेब्रुवारी २०१८- ब्ल्यू एअर या एअर प्युरिफिकेशन सोल्युशन्स क्षेत्रातील जागतिक स्तरावरील कंपनी ने आज ग्राहकांच्या कार, ट्रक्स आणि अन्य वाहनांमधील हवा स्वच्छ करण्याची गरज पूर्ण करण्यासाठी केबिन एअर ची सुरुवात करत असल्याची घोषणा केली ही इन व्हेईकल एअर प्युरिफायर्स ही २०१८ च्या दुस-या तिमाहीत बाजारपेठेत येणार असून याची रचना ही ब्ल्यूएअरच्या २० वर्षांहून अधिक अशा अत्याधुनिक अशा घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एअर प्युरिफायर्स तयार करण्याच्या अनुभवाचा उपयोग करून करण्यात आली आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून येते की ७२ टक्के लोकांना गाडीतील हवेच्या शुध्दतेची चिंता असते. तितक्याच म्हणजेच ७२ टक्के लोकांना हवेच्या प्रदुषणा विषयी विचारले असता त्यांनी चिंता व्यक्त केली. हे सर्वेक्षण हे ब्ल्यूएअर करता यूकेतील स्वतंत्र अशा बोनामी फिंच या संस्थेने केले होते.
”ग्राहकांची स्वच्छ हवेची गरज आम्ही पहात आहोत.” असे ब्ल्यूएअर चे सीईओ मेहमेत आल्टीनॉक यांनी सांगितलें ”आमच्या महत्वपूर्ण बाजारपेठांमधील हवेच प्रदुषण हे वाढत आहे आणि जगभरांत विशेष करून एशियन आणि मध्यपूर्वेतील प्रदुषणा विषयी जागरूकता वाढत आहे. याकरता आम्ही आमची कौशल्ये वाढवून सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरल्याने अधिकाधिक लोकांना आरोग्य उपलब्ध होऊ शकेल.” आल्टीनॉक म्हणाले.
ब्ल्यूएअर केबिन एअर चे सीईओ डॅनिअल हॅगस्टॉर्म यांनी सांगितले ” खूप कमी लोकांना हे माहित असते की बाहेरील रस्तयावर जितके प्रदुषण असते त्यापेक्षा १५ पट अधिक प्रदुषण हे गाडीत असते. गाडीतील हवेचे प्रदुषण तर असतेच पण त्याचबरोबर बाहेरील गाड्यंच्या धुरामुळेही वाढ होत असते. त्याचबरोबर टायर, रस्त्यावरील टायर उत्पादने यांमुळे धूळ ही व्हेंटिलेशन मधून किंवा एअरकंडिशनिंग सिस्टम मुळे प्रदुषणात वाढ होते.” हॅगस्टॉर्म पुढे म्हणाले.
ब्ल्यूएअर केबिन रेंजची उत्पादने ही चीन मध्ये जून २०१८ पासून होणार आहे. ही उत्पादने टिकाऊ अशा स्विडिश डिझाईन आणि सुरक्षा तसेच कार्यक्षमतेने युक्त अशी आहेत.
