भीम आर्मी संघटनेच्यावतीने समाज कल्याण आयुक्त कार्यालय येथे ” टाळा ठोको ” आंदोलन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पुन्हा दलित मागासवर्गीय तसेच आदिवासी समाजाचा सामाजिक न्यायासाठी व विकासासाठी असलेला २००० रु. कोटींचा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वर्ग केला . यापूर्वी रु. १००० कोटींचा निधी याच दोन विभागातून शेतकरी कर्जमाफीसाठी वर्ग केला होता . यामुळे आंबेडकरी चळवळीत प्रचंड संताप व्यक्त होत असून मुख्यमंत्र्यांची हि कृती घटना विरोधी आहे . दलित , आदिवासी समाजाच्या शैक्षणिक , सामाजिक व आर्थिक उन्नतीला खीळ घालणारी आहे . त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मी पुणे शहर जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी संघटनेच्यावतीने समाज कल्याण आयुक्त कार्यालय येथे ” टाळा ठोको ” आंदोलन करण्यात आले .
हा सामाजिक न्याय विभाग नाही तर हा सामाजिक अन्याय बिभाग आहे . मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही , ऑन लाईन फार्म भरू शकले नाही . वसतिगृहात अनेक प्रश्न आहेत , मुलांना टेबल खुर्च्या चटई खाट आदी वस्तूंची मागणी करूनसुद्धा उपलब्ध होत नाहीत. स्वाधार योजना , प्रतिपूर्ती योजना , दलित अत्याचार अनुदानाची अनेक प्रकरणे निधी अभावी पडून आहेत . विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्यात वाढ होत नाही .
असा सगळा भोंगळ कारभार समाज कल्याण खात्यात सुरु आहे . त्यामुळे राज्यसरकार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा जोरदार निषेध करत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी समाज कल्याण आयुक्तांच्या कार्यालयाला टाळे ठोकले . त्यावेळी सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली .
यावेळी संघटनेचे सीताराम गंगावणे ,प्रदीप कांबळे , नीता आडसुळे , सुनील बेंगळे , सुशीला सोनवणे , दीपाली भालेराव , राकेश साबळे , विवेक सावंत , दलितानंद तांदळे , दीपक बलाढे , संतोष पोवार , मुकेश गायकवाड , अर्चना सोनवणे , प्रिती पिल्ले , अप्पा आखाडे , बापू कांबळे , बाळासाहेब गायकवाड , महेश भिसे , संतोष मोहिते , विकी जावळे , अभिजित गायकवाड , हुसेन राजनाळ , हुसेन भोलावाले , श्रीकांत शेंडगे , सदा देवनावर , शरद आसण ,पूजा सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते .
