यशवंतरावांमध्ये द्रष्टया प्रशासकांचे गुण ओळखण्याचा गुण होता – शरद पवार

Share this News:

मुंबई दि. २५ – यशवंतराव चव्हाण यांचं प्रशासकांशी आगळंवेगळं नातं असे. ते
प्रशासकांना प्रोत्साहन देत व प्रशासक त्यांच्या कामांसाठी प्रयत्नांची
पराकाष्ठा करत. द्रष्ट्या प्रशासकांचे गुण ओळखणाऱ्या चव्हाण साहेबांच्या मनात
भुजंगरावांबद्दल नेहमीच आदराची भावना होती असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे काढले.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यावतीने स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या
३३ व्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय
पारितोषिकाचे मानकरी माजी प्रशासकीय अधिकारी भुंजगराव कुलकर्णी ठरले. भुंजगराव
कुलकर्णी हे साधे,स्वच्छ व्यक्तिमत्व व सचोटीने कार्य करणारे अधिकारी म्हणून
ओळखले जात असत. त्यांचा सन्मान करताना आनंद वाटला असेही शरद पवार म्हणाले. या
कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, आमदार हेमंत टकले,माजी आमदार अरुण
गुजराथी,ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते