राज्यस्तरीय चर्चासत्राचे बुधवारी पुण्यात आयोजन
पुणे :
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या वतीने बुधवारी गृहनिर्माण संस्था समोरील विविध प्रश्नांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कलम १०१ प्रमाणे थकबाकी वसुली, संस्थांच्या पुनर्विकासातील अडचणी व गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र विभाग या विषयावर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे.
हे चर्चासत्र विशाल सहयाद्री भवन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ( टिळक रस्ता ),येथे २५ जुलै , बुधवार,दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे.
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे श. त्रिं. भिडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
सहकार विभागाचे अधिकारी, गृहनिर्माण संस्थांचे पुणे, मुंबई, नासिक,ठाणे येथील प्रतिनिधी, आर्किटेक्ट, वकिल , मराठी बांधकाम व्यावसायिक संघाचे प्रतिनिधी या चर्चासत्रात सहभागी होतील.
