Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

# लक्झरी व ट्रकच्या अपघातात अग्निशमन दलाकडून चालकास जिवदान

Punekar News's photo.पुणे : पहाटे ३ च्या सुमारास बावधान पुला़जवळ मुंबई-बंगलोर हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकला एका प्रवासीPunekar News's photo. लक्झरी बसने मागून धडक दिली. पण सुदैवाने त्यामधील सर्व प्रवासी सुखरूप वाचू शकले. परंतु , या अपघाताते लक्झरी बस चालकाचा पाय पढील ब्रेकच्या भागात अडकला होता. स्थानिक पोलिसांनी अग्निशमन दलास याची खबर देताच दलाचे जवान रेस्क्यू व्हॅन व फायरगाडीसह घटनास्थळी दाखल झाले.

अवघ्या ४०-४५ मिनिटांत जवानांनी सर्क्युलर सॉ, कटर, रोप याचा वापर करून पत्रा कापून त्या चालकास बाहेर काढले. यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार म्हणून त्या जखमी चालकास सलाईनपण लावले होते. अशा प्रकारे जवानांनी हि कामगिरी पार पाडली.

यामधे पाषाण अग्निशमन केद्रांचे अधिकारी श्री.शिवाजी मेमाणे ; चालक – गुंजवटे, गोडसे; तांडेल – लाला मोरमारे , राजाराम केदारी तसेच फायरमन- सुनिल हंडाळ, गणपत पिंजण, किसन तरपाडे, अनिल पवार, किरण चौधरी, सुभाष जाधव, विठ्ठल साबळे, मंगेश मिळवणे, शंकर नाईकनवरे, रफिक शेख यांनी सहभाग घेतला.

‪#‎accident‬ ‪#‎punefirebrigade‬ ‪#‎bavdhan‬ ‪#‎pune‬ ‪#‎road‬ ‪#‎highway‬

Leave a Reply