वीजबिलांची दुरुस्ती प्रकिया ऑनलाईन ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती मिळणार ग्राहकसेवेसाठी महावितरणची नवीन उपाययोजना
महावितरणच्या ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करण्यासअडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ असावी यासाठीमहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्यावीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. याप्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याहीकार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून तीतक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. तसेचयाबाबतचा एसएमएसही ग्राहकांना देण्यात येईल.
वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्षसंबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजनाकरण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीयसंचालक श्री. संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ वऑनलाई करण्याचे निर्देश दिले होते.
या निर्देशानुसार नव्या ऑनलाईन प्रक्रियेत ग्राहकांनावीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल ॲप,ईमेल व व्टिटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासहमहावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे. या तक्रारीच्या सोडवणूकीसाठी मुख्यालय ते शाखाकार्यालयांपर्यन्तच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवरतक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आलीआहे. तक्रार आल्यानंतर ती किमान ९ दिवसांत सोडवावी,असे निर्देश संबंधितांना देण्यात आलेले आहेत. जर ग्राहकांचेवीजबील बरोबर असेल तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएसप्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबील भरण्याचे आवाहनकरण्यात येईल. परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्तीकरण्याची गरज असेल तर ते वीजबील संबंधित शाखाकार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फतग्राहकांच्या वीजबील तक्रारीच्या संदर्भात आवश्यक ती प्रत्यक्षपडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिमवीजबील ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हाएसएमएस दाखवून ग्राहकाला आपल्या वीजबिलाचा भरणाकरता येईल.
महावितरणने याबाबत परिपत्रक जारी केले असून यातऑनलाईन वीजबील दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद करण्यातआलेली आहे. महावितरणच्या या नवीन उपाययोजनांमुळेग्राहकांना वीजबील दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. तसेचत्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.
