स्पोर्ट्स सायन्सेस या शिक्षण शाखेचा विस्तार होणे गरजेचा – जे संधू
सिंबायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस आयोजीत पहिल्या नॅशनल स्पोर्ट्स सायन्स काँग्रेस चे उदघाटन विद्यापीठ अनुदान अयोग चे सचिव जे संधू यांनी केले.यावेळी रिओ ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या कविता राऊत, अथेलेटिकस, ललीत बाबर, अथेलेटिकस आणि दत्तू बोकनल, रोइंग या महाराष्ट्रातील खेळाडूंचासत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, बायोमेडिकल आणि हेल्थ सायन्सेस चे अधिष्ठाता डॉ. राजीवयेरवडेकर, सिंबायोसिस स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्सेस च्या संचालिका नयना निमकर आदी उपस्थित होते.
उदघाटनाच्या वेळी डॉ. राजीव येरवडेकर म्हणाले की, “अनेक छोट्या शहरातून येऊन आणि अनेक अडथळे पार पडून महाराष्ट्रातले खेळाडू रिओ ऑलिम्पिक मध्ये गेले,त्यांचा सत्कार करून या महत्वाच्या अशा कार्यक्रमाच्या उदघाटन करणे ही आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे.”
खेळामध्ये भरपूर पदके मिळवण्यासाठी भारतामध्ये स्पोर्ट्स सायन्सेस या शिक्षण शाखेचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान अयोग चेसचिव जे संधू यांनी केले. ते म्हणाले, आपण खेळाडूंना पदके मिळवत नाहीत म्हणून नावे ठेवतो मात्र त्यांना पूरक अशा महत्वाचे प्रशिक्षण आणि आधार देणे गरजेचेआहे. त्यासाठी देशात स्पोर्ट्स सायन्सेस या शिक्षण शाखेचा विस्तार होणे गरजेचे आहे. या माध्यमातून खेळाडूंना क्रीडा मानसशास्त्र, क्रीडा आहारशास्त्र, फिझीओथेरपी,क्रीडा औषधशास्त्र आदी चा आधार देऊन त्यांना परिपूर्ण असे शिक्षण दिल्यास त्यांची कामगिरी अजूनच चांगली होईल. अशा अनेक गोष्टींचे ज्ञान हे स्पोर्ट्स सायन्सेसच्या माध्यमातून देता येईल आणि हे ज्ञान देणाऱ्या शिक्षण संस्था कमी असून सिंबायोसिस ने या विषयाशी निगडित अनेक छोटे मोठे अभ्यासक्रम तयार केले की त्यालाआशिया मधून चांगला प्रतिसाद मिळेल.
