एजीसतर्फे दुसऱ्या डाटा सायन्स काँग्रेसची घोषणा
मुंबई – 29 मार्च, एप्रिल, 2018: डाटा सायन्स काँग्रेस 2017च्या यशस्वी आयोजनानंतर, एजिस स्कूल ऑफ डाटा सायन्सने डाटा सायन्स काँग्रेस(डीएससी) या भारतातील सर्वात मोठ्या डाटा सायन्स उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन मे 29 ते जून 1, 2018 या कालावधीत सिडको कन्व्हेन्शन सेंटर, नवी मुंबई येथे केले आहे.
डीएससी ही एजिसने विविध उद्योगांतील व क्षेत्रांतील व्यक्तींच्या मदतीने सुरू केलेली तीन दिवसांची परिषद व एक दिवसाची कार्यशाळा आहे.डीएससी 2017ला भरभरून यश मिळाले. भारतातील डाटा सायन्स क्षेत्राच्या अलीकडच्या काळातील या कार्यक्रमात 2094 पाहुणे सहभागी झाले होते. डीएससी 2018मध्ये याहून अधिक पाहुणे येण्याची अपेक्षा आहे.
एजिसने भारताला डाटा सायन्सच्या केंद्रस्थानी स्थान मिळण्याच्या उद्देशाने व व्हेंडरच्या दृष्टीने सोयीचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने डीएससीची सुरुवात केली. डीएससी हे नावीन्य साकरणारे स्टार्ट-अप, डाटा सायण्टिस्ट,तंत्रज्ञान व्हेंडर, उत्पादने, सेवा व सोल्यूशन देणारे यांच्यामध्ये संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती,नावीन्य अधोरेखित करण्यासाठी आणि काही केसेसची चर्चा करण्यासाठी आदर्श व्यासपीठ आहे.
डीएससीचे संस्थापक व एजिस स्कूल ऑफ डाटा सायन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुपेश दहेरिया यांनी सांगितले, “डाटा सायन्स काँग्रेसच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. डाया सायन्स युजर व व्हेंडर यांच्यासाठी औपचारिक व्यासपीठ नसल्याने त्यांनी ही तफावत भरून काढण्याचे व कौशल्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी जागृती करण्याचे आवाहन केले. डीएससी यापुढेही भारतीय टॅलेण्टला व अॅनालिटिक्स, बिग डाटा, एआय, मशीन लर्निंग,सायबर सिक्युरिटी व आयओटी या क्षेत्रांतील डाया सायण्टिस्टना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी मदत करणार आहे, जेणे करून भारताला डाटा सायन्स या क्षेत्रात झेप घेता येईल.”
डीएससी 2018साठी मध्यवर्ती संकल्पना अॅनालिटिक्स, बिग डाटा, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, कॉग्निटिव्ह,ब्लॉकचेन व सायबर सिक्युरिटी ही आहे. 4 दिवसांच्या या कार्यक्रमात प्रमुख भाषणे, मंत्रीस्तरीय परिसंवाद होतील – भारतातील विविध राज्यांच्या आयटी मंत्र्यांना परिसंवादासाठी आमंत्रित केले जाईल; आयटी सचिवस्तरीय परिसंवाद – भारतातील विविध राज्यांच्या आयटी सचिवांना परिसंवादासाठी आमंत्रित केले जाईल; बीएफएसआय, आरोग्य, ब्लॉक चेन, टेलिकॉम, रिटेल, उत्पादन, मीडिया व मनोरंजन यावर परिसंवाद होईल, तसेच सीईओ राउंड टेबलमध्ये आघाडीच्या आयटी कंपन्यांचे सीईओ सहभागी होतील.
या वर्षीच्या आयोजन समितीमध्ये टेक महिंद्राचे डेप्युटी सीटीओ अमित दुबे; नीती आयोगाचे हेड अॅनालिटिक्स डॉ. अविक सरकार; व्हीएफएस ग्लोबलचे सीटीओ मुकेश जैन; फ्रॅक्टल अॅनालिटिक्सचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर समीर धनराजिनी यांचा समावेश असून ते या सर्वात मोठ्या डाटा सायन्स कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि भारत हे डाटा सायन्सचे केंद्र ठरण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांसाठी योगदान देत आहेत.
डीएससी 2017चे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री वाय. एस. चौधरी यंच्या हस्ते झाले, तर पहिले चीफ डाटा ऑफिसर डॉ. उसामा फय्याद यांनी उद्घाटनपर भाषण केले. अंदाजे 68 वक्त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले व परिसंवादामध्ये भाग घेतले, तसेच नीती आयोग, नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरिएट (एनएससीएस), विज्ञान व तंत्रज्ञान विभाग,अॅमेझॉन, एआयजी, आयबीएम रिसर्च, वॉलमार्ट लॅब्ज, मेकमायट्रिप,एनव्हीआयडीआयए, सिस्को, टेब्लु, पीडब्लसू, सॅप, एडलविस, फ्रॅक्टलअॅनालिटिक्स, अमेरिकन एक्स्प्रेस, रिलायन्स जिओ, ग्रेमेनर, आरबीआय,मंत्रा अशा विविध संस्थांतील डाटा सायण्टिस्टही सहभागी झाले होते.
