कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचे भूमिपूजन थेरगांव येथे रविवारी

Share this News:

दिनांक : १० मे, २०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्यावतीने थेरगांव येथे उभारण्यात येणाऱ्या कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवनाचा भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक १३ मे, २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते,कार्यक्रमाचे अध्यक्ष महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, सुप्रिया सुळे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अॅड. गौतम चाबुकस्वार, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी उपमहापौर शैलजा मोरे,स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, सर्व पक्षांचे गटनेते आयुक्त श्रावण हर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर,काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे सर्व समितीचे सभापती,सर्व प्रभाग समिती अध्यक्ष तसेच स्थानिक नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी कामगार भवन समितीचे अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर,अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, समिती सदस्य चारुशीला जोशी, अंबर चिंचवडे, राजेश लांडे,चंद्रकांत इंदलकर, विजय खोराटे, मनोज माछरे,माणिक बुचडे आदींसह समितीचे सर्व सदस्य पिंपरी चिंचवड मनपा सेवकांच्या पतसंस्थेचे पदाधिकारी संचालक आदी उपस्थित होते. कै. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन (नियोजित) प्रभाग क्र. २३ सर्व्हे नं. ९ दिलीप वेंगसरकर क्रिकेट अॅकेडमी जवळ,थेरगांव, पुणे येथे रविवारी सकाळी १०.३० वाजता भूमिपूजन संपन्न होणार असुन यानंतर कैलास मंगल कार्यालय, थेरगांव येथे ११.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.