गोव्यात सर्वोत्तम पसेंजर फेरी सेवा देण्याकरिता दृष्टी मरीन सज्ज

Share this News:

गोव्यातील उत्तम लाईफगार्डींग संस्था दृष्टी मरीनने राज्यात आपला कार्य विस्तार करण्यास सुरुवात केली असून लवकरच उत्कृष्ट फेरी सेवांची सुरुवात होईल. पर्यटक आणि स्थानिक रहिवासी आता 40 आसनी आलिशान कटॅमरेनमध्ये बसून गंतव्य ठिकाण येईपर्यंत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य टिपू शकतील.

नोव्हेंबर 2017 पासून गोव्यात या फेरी सेवा कार्यान्वित होतील.

दृष्टी फेरीने दोन आलिशान 40 आसनी, वेगवान कटॅमरेन घेतल्या असून त्या प्रवाशांना पिक-अप पॉइंट्सवरून घेऊन इच्छित ठिकाणी नेतील. दृष्टी टू आणि दृष्टी थ्री या नावाने असलेल्या कटॅमरेन विना-अडथळा, स्थिर सफरीच्या दृष्टीने प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील व त्यांना पणजी, बागा, जुना गोवा, सिक्वेरीमचा अग्वादा किल्ला दाबोलीम किनाऱ्यांची आरामदायी आणि नयनरम्य यात्रा घडवून आणतील. राज्यात दोन प्रवासी फेऱ्या नियमित प्रवासासाठी उपलब्ध असतील.

आलिशान फेरी बोटींमध्ये आरामदायी आसन व्यवस्था,प्रशस्त अंतर्गत सजावट, स्वच्छ बाथरूम, चार्जिंग पॉइंट्स आणि सुरक्षा बेल्टची सोय आहे. वातानुकुलित प्रवासी लाउंज आणि वेटींग एरिया, ऑन-बोर्ड बॅगेज सहाय्य सोबत मोफत व्हाय-फाय, पाकीटबंद अन्नपदार्थ व पेय उपलब्ध असतील. फेरीवरील क्रुसोबत लाइफ गार्डसही असतील. त्यांना बचावाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे,”असे दृष्टी मरीनचे सीईओ जी रवी शंकर यांनी सांगितले.

ही नयनरम्य फेरी सेवा पर्यटक आणि स्थानिकांसाठी केवळ एक सर्वोत्तम सेवा नसून राज्य पर्यटन विभागाचा दूरदर्शी उपक्रम आहे. ज्यामुळे दरवर्षी राज्याला भेट देणाऱ्या शेकडो, हजारो पर्यटकांच्या ‘थिंग्ज टू डू’ इन गोवा (गोव्यात आल्यावर करायच्या गोष्टींची यादी)मध्ये आणखी एक पर्याय दाखल होईल.

वेबसाईट www.drishtiferry.com आता लाइव्ह आहे. या फेरी सेवेची तिकिटे आता सुलभ युजर-फ्रेंडली प्रक्रियेने ऑनलाइन बुक करता येतील. तसेच सेवा सुरू झाल्यावर बोटीत चढण्यापूर्वी काउंटरवरही तिकिटे उपलब्ध असतील. जुना गोवा ते पणजी दरम्यानच्या प्रवासाकरिता रु 100 तर बायना विमानतळ फेरी टर्मिनल(एएफटी) ते पणजी प्रवासासाठी रु. 800 मोजावे लागतील.

विमानतळ फेरी टर्मिनल हे बायना बीच, वास्को द गामा येथे असून ते गोव्याच्या दाबोलीम विमानतळापासून 5 किमी अंतरावर आहे. हवाई मार्गाने येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरिता फेरी टर्मिनल ते विमानतळा दरम्यान मोफत शटल सेवा उपलब्ध असेल.

या फेरी विशेष बांधण्यात आलेल्या जेटी पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ पॉइंटवर आगमन-प्रस्थान करतील. या टर्मिनल्सना वॉटर स्पोर्ट झोन, प्रवासी लाउंज आणि मल्टी-कुसीन कॅफेची सोय असणार आहे. या टर्मिनल्सवर तिकिटिंग किओक्स, वेटींग एरिया आणि जेट्टीला जोडलेला सुलभ मार्ग देखील असेल.

दृष्टी मरीन पहिला टप्पा एअरपोर्ट फेरी टर्मिनल (एएफटी) वास्को, पणजी आणि जुना गोवा असा राहील तर दुसरा टप्पा वर्षाच्या उत्तरार्धात बागा आणि अग्वादा किल्ल्याचे अंतर समाविष्ट करणारा असेल.

टप्पा 1: [फेरी मार्ग: दृष्टी टू] नोव्हेंबर 2017 पासून सुरू होणार

टप्पा 1

सिम्फनी / दृष्टी टू

जुना गोवा

पणजी

एएफटी

पणजी

जुना गोवा

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

8.00

8.15

8.25

8.55

9.30

10.00

10.10

10.20

11.30

11.45

11.55

12.25

14.00

14.30

14.40

14.50

15.30

15.45

15.55

16.25

17.00

17.30

18.15

18.25

* मार्ग आणि वेळा समुद्र व हवामानाच्या स्थितीच्या अधीन राहील.

दृष्टी फेरी भाडे आकार:

पणजी (बंदराचा कप्तान) ते जुना गोवा: रु 100 (विना-वातानुकुलीत) आणि रु. 150 (वातानुकुलीत)

विमानतळ फेरी टर्मिनल ते पणजी: रु 500 (विना-वातानुकुलीत)आणि रु 800 (वातानुकुलीत)

जुना गोवा ते विमानतळ फेरी टर्मिनल: रु 550 (विना-वातानुकुलीत)आणि रु 850 (वातानुकुलीत)

टप्पा 2 [फेरी मार्ग: दृष्टी थ्री] यावर्षी उत्तरार्धात सुरू होईल

टप्पा 2

व्हिक्टरी / दृष्टी थ्री

जुना गोवा

पणजी

अग्वादा

बागा

एएफटी

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

आगमन

प्रस्थान

आगमन

08:20

08:30

08:40

08:55

905

09:15

09:25

09:40

10:15

10:30

10:45

11:10

13:45

14:05

14:15

14:35

15:00

15:25

15:35

15:55

16:05

16:30

16:45

17:05

17:15

17:35

18:15

18:45

18:55

19:05

19:15

19:35

19:45

20:15

20:25

19:55

20:05

21:30

21:10

21:20

20:45

21:00

* मार्ग आणि वेळा समुद्र व हवामान स्थितीच्या अधीन राहील.