ढोले पाटील अभियांत्रिकीची राष्ट्रीयस्तरावरील शुटींग स्पर्धेत निवड
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन रायफल शुटींग स्पर्धेत वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दिव्याराणी अड्प्पा हिला रौप्य पदक मिळाले आहे.या स्पर्धेतील विजयामुळे तिची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे.तिच्या या यश प्राप्तीचे महाविद्यालयाकडून कौतुक होत असून तिच्या कामगिरी बद्दल ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील यांनी तिचे विशेष सत्कार करत अभिनंदन केले आहे.
