ढोले पाटील अभियांत्रिकीत क्षितीज कला,क्रीडा सप्ताहाचे आयोजन
पुणे :वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकीमहाविद्यालयामध्ये
सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक/क्रिडासप्ताहाचे उदघाटन संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश आलमपल्लेवार,उपप्राचार्य अभिजीत दंडवते,कार्यक्रमाचे संयोजक डॉ.सचिन राजस आदी मान्यवर उपस्थित होते.उदघाटन प्रसंगी आपले मत व्यक्त करताना सागर ढोले पाटील म्हणाले कि अशा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माद्यमातून उद्याचे उत्कृष्ठ कलाकार घढण्याला मदत मिळते अशा माद्यमातून एखाद्या विद्यार्थ्यांला आपली कला सादर करण्याची संधी मिळावी हाच आयोजनामागचा हेतू आहे .
क्षितीज या सांस्कृतिक/क्रिडा सप्ताहाच्या माद्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत,आप कि अदालत,क्रिकेट स्पर्धा ,बास्केट बॉल,टेबल टेनिस,रनिंग कॉ,हॉली बॉल,फुटबॉल,ट्रेडीशनल डे,लुक लाईक डे ,डेबिट कॉमपिटीशन,क्युज कॉमपिटीशन,म्युजिक कॉमपिटीशन,फनफ़ेअर,सांस्कृतिक कार्यक्रम,कला प्रदर्शन,स्टाईल डे,रेट्रो लुक डे ,अश्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.विद्यार्थ्यांनी या सप्ताहासाठी जयत्त तयारी केली असून महाविद्यालया मध्ये प्रत्येक जन विविध वेशभूषे मध्ये वावरताना दिसून येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज,बाजीराव -मस्तानी,लोकमान्य टिळक,सावित्री बाई फुले ,महात्मा फुले,यांच्या वेशभूषेचा यात समावेश आहे .उत्साहात सुरु झालेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत त्या विजयाच्या
