नवजात शिशूंसाठी नैसर्गिक पद्धतीने हिवाळ्यातील काळजी
हिवाळा हा एक असा ऋतू आहे जेव्हा बहुतांश पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रतिकारशक्तीबाबत काळजी वाटत असते. तापमान कमी होण्याबरोबरच वारंवार संक्रमण होण्याचीही अतिरिक्त जोखिम असते. बाळाची संवेदनशील त्वचा हिवाळ्यात कोरडी पडू नये यासाठी जास्त काळजी घ्यावी लागते.
आयुर्वेद तज्ज्ञ आणि हिमालया ड्रग कंपनीच्या संशोधन व विकास तज्ज्ञ, डॉ. प्रतिभा म्हणतात “बाळाची त्वचा नैसर्गिकरित्या आर्द्र आणि ओलसर असते आणि बाळाच्या त्वचेची मृदूता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक कोमल निगा नैसर्गिक उत्पादनांतूनच मिळते.”
डॉ. प्रतिभा, पालकांना अशी बेबी केअर उत्पादने वापरण्याची शिफारस करतात जी वनौषधी आणि नैसर्गिक घटकांनी समृध्द असतील जसे की ऑलिव्ह ऑईल, कोरफड, जास्वंद, बदामाचे तेल आणि खोबरेल तेल ज्यामुळे कोरडी त्वचा मऊ मुलायम होते. “तुमच्या बाळाला मालीश करण्यामुळे त्याच्या त्वचेमध्ये आर्द्रता मुरण्यास मदत होते. ऑलिव्ह ऑईल आणि बदामाचे तेल असलेल्या मॉयश्चरायझरमुळे त्वचेची कोमलता सुधारते” हिवाळ्यामध्ये डायपर रॅश सामान्य असतो आणि यासाठी तुमच्या बाळाच्या कुल्ल्यांवर त्रासदायक पुरळ येऊ नये यासाठी डायपर रॅश क्रीम वापरण्याचा डॉ. प्रतिभा सल्ला देतात.
