नवरत्न गुणगौराव पुरस्कार विविध मान्यवारांच्या हस्ते मला देवून सन्मानित करण्यात आले: Adv Ramesh Rathod
आदरणीय माझ्या बंधू भगिनिंनो आपल्या सर्वांचे मार्गदर्शन,आशीर्वाद,सहकार्य मुळेच सामाजिक कामे करण्याची प्रेरणा व ऊर्जा मिळते.मी करत असलेली सामाजिक कामाची दखल घेवून श्री जय भवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ तसेच रांझणी सुधाकरपंत परिचारक वाहतूक सहकारी संस्था पंढरपुर यांच्या वतीने काव्य संमेलनामध्ये दिला जाणारा *नवरत्न गुणगौरव पुरस्कार 2018-19* सदरील हा पुरस्कार पंढरपुर मंगळवेढाचे आमदार माननीय भारत नाना भालके साहेब,युवा नेते माननीय प्रणव परिचारक साहेब,पंढरपुरचे नगराध्यक्ष नागेश भोसले साहेब,सुप्रसिद्ध कवी राजेंद्र सगर सर,कवियत्री सौ अनुजा कल्याणकर मॅडम,कवियत्री सौ सौ सिंधुताई दहिफळे मॅडम,कवी प्रो संतोष पाचपुते सर,कवी आनंद गायकवाड सर,कवी गणेश गायकवाड सर,कवी गजानन गायकवाड़ सर,कवी अनिल सांगळे सर,कवी श्रीगणेश पंडे सर,कवी प्रशांत वाघ सर,कवी इंद्रजीत घुले सर,नगरसेवक संजय निंबाळकर साहेब इत्यादी मान्यवर व साहित्य क्षेत्रामधील विविध मान्यवरांच्या हस्ते दिनांक 20/05/2018,वार-रविवार रोजी देवून माझे सत्कार करण्यात आले..!
सदरील हा पुरस्कार काव्य संमेलनाच्यावेळी देण्यात आले.अनेक कवी मान्यवरांनी हृदयाला स्पर्श करणारी कविता सादर करुन सर्व उपस्थितांची मने जिंकली..! ग्रामीण भागातून हा पुरस्कार स्विकारताना अजुन भरपूर समाजाची कामे करण्याची ऊर्जा माझ्या मनात निर्माण झाली आहे.या संमेलनाचे मुख्य आयोजक व संयोजक प्रवीण भाकरे सर,सर्जेराव घाडगे सर,सोमनाथ स्वामी सर व समस्त रांझणी गाव यांनी केले होते..!
