पर्वती येथील गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करणाऱ्या वनखात्याच्या निषेध व पालकमंत्र्यांचे आश्वासन पुनर्वसन

Share this News:

पर्वती येथील अधिकृत झोपड्या असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पुनर्सवन न करता अतिक्रमण नावाखाली उध्वस्त केलेल्या कारवाईचा निषेध झोपडपट्टी सुरक्षा दलाने केला उध्वस्तझालेल्या झोपडी धारकांनी पुणे शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी सौरव राव आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांना घेराओ घालून निवेदन केले .

या निवेदनात १ जानेवारी २००० पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीधारकांना शासनाचे संरक्षण असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा न करता थंडीच्या वातावरणात या दलित उपेक्षितांच्या झोपड्या निर्दयपणे उध्वस्त केल्या हे निदर्शनास आणून दिल्याने पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी तात्काळ पुरावे तपासून , बी. एस. यू. पी. अंतर्गत घरकुल देण्याचे आदेश दिले . व घरकुल मिळेपर्यंत आहे . त्याच जागी तात्पुरता निवारा देण्याचे आश्वासन दिले .

या शिष्टमंडळाने नेतृत्व संघटनेचे नेते भगवानराव वैराट , प्रा. सुरेश धिवार , काशिनाथ गायकवाड , मोहम्मद शेख , वामन कदम ,सुरेखा भालेराव , प्रतिभा गायकवाड , मंगल लोंढे , विष्णू खोबरे , लक्ष्मण मुजमले , यशवंत खोबरे यांचा समावेश होता .