पिंपरी मध्ये 6 टन ( 6000 किलो ) गोमांस जप्त

Share this News:

9.7.2018 रात्री 9 : 00 वा पिंपरी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अहमदनगर येथून गायी व बैल कापून मुंबई येथे त्यांचे मांस विक्रीसाठी टेम्पो नं . MH.04.E Y.9968 मध्ये भरून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्यान अधिकारी ) , कुणाल साठे , मंगेश नढे , सचिन जवळगे , गौरव कुदळे यांनी जुना पुणे मुंबई रस्त्यावर साफळा रचून थांबविली व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून सर्व माहिती देऊन पोलिसांची मदत मागितली. टेम्पो चालकाकडे गाडीत काय आहे असे विचारले असता त्याने गायी व बैलाचे मांस असल्याचे सांगितले व ते मी अहमदनगर येथे कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे कसाई मोहल्ल्यात भरून मुंबई येथे घेऊन जात असल्याचे सांगितले गोरक्षकांनी टेम्पो चे शटर उघडून पहाणी करत असताना टेम्पो चालक गोरक्षकांची नजर चुकवून पळून गेला. पोलिसांच्या मदतीने टेम्पो पो स्टे येथे आणला.त्यानंतर पोलिसांच्या समक्ष पशुवैधकीय अधिकारी डॉ. श्री चव्हाण व शिवशंकर स्वामी यांनी गाडीची तपासणी केली असता *टेम्पोत गायी व बैलांचे मुंडकी , मोठे मांस व पाय , दोन 6 महिन्यांच्या वासराची मुंडकी दिसले.* पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य दिले.आणि कसायांना सहकार्य करणाऱ्या शेतकाऱ्यासह गायी कापणारा , गोमांस विकत घेणारा , ड्रायव्हर व गाडी मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 चे कलम 5 ( क ), 9 प्रमाणे गुन्हा दाखल करून शिवशंकर स्वामी ( मानद पशुकल्याण अधिकारी ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. यावेळी यशवंत कर्डिले ,गौरव पाटील , स्वामी दीक्षित व इतर 50 ते 60 गोरक्षकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे मनःपुर्वक आभार !