Pimpri – Sexual favors demand from teacher, 4 accused get interim anticipatory bail

Share this News:

पुणे ः प्रतिनिधी

पिंपरी येथील नामांकित शाळेच्या उच्च पदस्थ महिलेशी लगड करून तिला शरिर सुखाची मागणी केल्याप्रकरणी शाळा समिती अध्यक्षासह चौघांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता चौघांनीही शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

शाळा समिती अध्यक्ष अरूण नहार (50, रा. औंध), एस. डी. कदम (52, रा. वाघोली), बी. बी. चौघुले (63, रा. चतुःश्रृंगी) आणि कोचर सर (52, रा. वडगावशेरी) अशी अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत 51 वर्षीय पिडीत महिलेनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पिडीत महिलेनी वारंवार पोलिस ठाण्याच्या चकरा मारल्यानंतर याबाबतची एफआयआर नोंद करून घेतल्याची व चौघांनी यामध्ये तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविल्याची माहिती महिलेचे वकील अ‍ॅड. रमेश राठोड यांनी दिली. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. एस. के. जैन तर फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. रमेश राठोड काम पाहत आहेत. या तात्पुरत्या अटकपूर्व जामीनावर 23 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.