पोलरॉइडकडून स्प्रिंग/ समर 2018 कलेक्शनचे अनुष्का शर्मासोबत अनावरण
पुणे, 12 फेब्रुवारी 2018- पोलरॉइड आयवेअर या ओरिजिनल पोलरॉइड लेन्सेसचे संशोधक आणि मागील 80 वर्षे जगभरातील लाखो लोकांसाठी पॉप कल्चरचे प्रतीक ठरलेल्या ब्रॅण्डने आपल्या नवीन स्प्रिंग/ समर 2018 आयवेअर कलेक्शनचे अनावरण ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अनुष्का शर्मासोबत केले. हे नवीन कलेक्शन रंग आणि आकार यांचा उत्सव असून त्यामुळे ब्रँडला पुन्हा एकदा स्टाइल जगताच्या केंद्रस्थानी आणण्यात मदत झाली आहे.
नवीन कलेक्शनची ओळख ठरणाऱ्या गोष्टींमध्ये पॉप प्रेरणा, समकालीन स्टायलिंग आणि निरनिराळे आकार यात आहेत. ब्रँडच्या कलेक्शनमधील विविध आकारांमध्ये विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे आणि स्पोर्टी लुकसाठी फ्लुरोसंट कलर, वापरण्यास सोप्या असलेल्या श्रेणीतील मिनिमलिस्ट स्टाइल्स या नवीन फॅशन ट्रेंड्सशी सुसंगत आहेत.
पोलरॉइडच्या नवीन आयवेअर कलेक्शनबाबत बोलताना आयएमईए आणि एपीएसीचे व्यवस्थापकीय संचालक करियाकोस कोफिनास म्हणाले की, स्टाइल, प्लेफुल, कूल असे ब्रँडचे महत्त्वाचे घटक पुनरूज्जीवित करताना अनुष्का शर्माच्या साथीने आणलेले पोलरॉइडचे नवीन कलेक्शन ताज्या आणि स्मार्ट लुकच्या शोधात असलेल्या मिलेनियल तरूणांच्या पसंतीला उतरेल. अनुष्का शर्मा तरूण आहे, देखणी आहे आणि तिची स्टाइल यांच्यामुळे या ब्रॅण्डच्या पॉप आणि नावीन्यपूर्ण स्पिरिटसाठी ती योग्य आहे.
नावीन्यपूर्णतेबाबत कायमच आघाडीवर असलेल्या पोलरॉइडचे कलेक्शन सातत्यपूर्ण स्टायलिस्टिक संशोधनाचा परिणाम आहेत. या स्प्रिंग/ समर कलेक्शनमध्ये 2.0 पोलराइज्ड लेन्स आणले गेले आहेत. या नवीन जाड आणि मजबूत लेन्समधून समोरचे दृश्य जास्त चांगले आणि कोणत्याही अडथळ्यांविना पाहता येते आणि लेन्सचे विविध प्रकारचे रंगही आपल्याला पाहता येतात.
ब्रँडच्या प्रमुख तत्वांबाबत बोलताना ब्रँड अॅम्बेसेडर अनुष्का शर्मा म्हणाली की, मला पोलरॉइडचे स्प्रिंग/ समर 2018 कलेक्शनचे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे. हे नवीन पॉप इन्स्पायर्ड कलेक्शन स्टायलिश, कूल आणि आरामदायी आणि नवीन स्टाइलमध्ये आहे. हे माझे पोलरॉइडसोबतचे दुसरे वर्ष आहे आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वर्षांचा वारसा असलेल्या ब्रँडचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे.
