बुधवारी वाघोली येथे वीजग्राहक तक्रार निवारण दिन
पुणे, दि. 04 : वाघोली परिसरातील वीजग्राहकांसाठी महावितरणने बुधवारी (दि. 5) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाघोली येथील पूर्वरंग सोसायटी क्लब हाऊसमध्ये (फुलमळा रोड, महावितरण कार्यालयाजवळ, उंडरे पेट्रोल पंपामागे) वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे.
मुळशी विभाग अंतर्गत वाघोली परिसरात अनेक वीजग्राहकांना चुकीची वीजबिले मिळाल्याच्या तक्रारी महावितरणला प्राप्त झालेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर वीजबिलविषयक व अन्य सेवेबाबत तक्रारी असल्यास त्याचे निवारण करण्यासाठी वाघोली येथे स्वतंत्र वीजग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन बुधवारी (दि. 5) करण्यात आले आहे. वाघोली परिसरातील वीजग्राहकांनी याउपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीनेकरण्यात आले आहे.
